Maharashtra News LIVE Updates: वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी; जॉर्जची कडक सेंच्युरी! भारताने विक्रमी विजयासह गाठली U19 वर्ल्ड कपची फायनल

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 20:50 IST2026-02-04T10:06:45+5:302026-02-04T20:50:37+5:30

Today's Breaking Marathi News Live Updates in Marathi: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत आपण नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट ...

Maharashtra Marathi News Live Updates: 4 February 2026: Lok Sabha, Parliament Session, Rahul Gandhi, Narendra Modi, BMC mayor, Sharad Pawar on NCP merger, Devendra Fadnavis, Ajit Pawar Death, Sunetra pawar | Maharashtra News LIVE Updates: वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी; जॉर्जची कडक सेंच्युरी! भारताने विक्रमी विजयासह गाठली U19 वर्ल्ड कपची फायनल

Maharashtra News LIVE Updates: वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी; जॉर्जची कडक सेंच्युरी! भारताने विक्रमी विजयासह गाठली U19 वर्ल्ड कपची फायनल

Today's Breaking Marathi News Live Updates in Marathi: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत आपण नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं असून सुनेत्रा पवार यांच्या निवडीचे संकेत दिले आहेत. तसंच, विविध नेत्यांच्या दाव्यांमुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चाही पुन्हा रंगण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी अपघाती मृत्यूपूर्वी एक फोन केल्याचं चौकशीत समोर आलंय. तिकडे, राजधानी दिल्लीत लोकसभेत वातावरण तापल्याचं चित्र आहे. सत्ताधारी विरुद्ध विरोधकांमुळे जोरदार वाक्-युद्ध पाहायला मिळतंय. सभापतींच्या दिशेनं कागद भिरकावल्यानं सहा खासदारांना काल निलंबित करण्यात आलंय. त्यावरून आता हा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. ट्रम्प टॅरिफ आणि अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावरूनही बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. क्रिकेट वर्तुळात टी-२० वर्ल्ड कपचे वारे वाहू लागलेत. या आणि अशा महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

LIVE

Get Latest Updates

04 Feb, 26 : 08:47 PM

वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी; जॉर्जची कडक सेंच्युरी! भारताने विक्रमी विजयासह गाठली U19 वर्ल्ड कपची फायनल


एरॉन जॉर्जचं दमदार शतक ११५ (१०४) आणि वैभव सूर्यवंशीसह ६८ (३३) आयुष म्हात्रेच्या ६२ (५९) अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये विक्रमी विजय नोंदवत अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलच तिकीट मिळवले आहे.  या स्पर्धेत सहाव्यांदा जेतेपद मिळवून इतिहास रचण्यासाठी युवा टीम इंडिया आता इंग्लंडला भिडणार आहे.

04 Feb, 26 : 08:40 PM

"बेस्ट मुख्यमंत्री फडणवीस, लाडके भाऊ शिंदे कुठे आहेत?", मनसेची महामार्गावरील कोंडीवरून टीका

"बेस्ट CM फडणवीस साहेब कुठे आहेत?? 24 तास मुंबई-पुणे एक्सप्रेस वर माता भगिनींचे ट्रॅफिक जाममध्ये हाल होत आहेत. यंत्रणा आणि सरकार गायब. लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब कुठे आहात? विकासाला विवेकाची जोड नसली की काय होते हे पाहतोय महाराष्ट्र", अशी टीका मनसेचे नेते गजानन काळे यांनी केली आहे.  

04 Feb, 26 : 08:36 PM

"ते जे बोलले आहे, तेच मी सांगितलं आहे", अमोल मिटकरींचा नवा दावा काय?

"गोजुबावीचे माजी सरपंच कल्याण आटोळे यांनी माझा दावा फेटाळल्याच्या बातम्या मी बघितल्या. मी ते जे बोलले तेच सांगितल आहे. आणि त्यांनीही मी बोललो तेच व्यक्त केल आहे. दोघांच्या बोलण्यातील समान दुवा एकच आहे 'विमानाच्या आतून कुणीतरी बाहेर पडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे दिसले 'परत' हा 'कुणीतरी' शब्द महत्वाचा", असे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. 

04 Feb, 26 : 07:52 PM

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ठप्प; जिथे उलटला गॅसचा टँकर तेथील आता स्थिती काय? पहा व्हिडीओ

गॅस घेऊन जाणारा टँकर उलटून २४ तास लोटले आहे. तरीही मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर झालेली वाहतूक कोंडी अद्यापही कायम आहे. उलटलेल्या टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरण्यात आला. मात्र, तरीही महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत झालेली नाही. 

04 Feb, 26 : 06:38 PM

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कोंडी! शिवनेरीसह १३९ बस फेऱ्या रद्द, १६३ बसेस अडकल्या

पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, या घटनेचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवांवर झाला आहे. परिवहन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, या अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विविध विभागांमधील एकूण १३९ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये ७३ ई-शिवनेरी व ६६ इतर बस फेऱ्यांचा समावेश आहे.

तसेच, या एक्सप्रेस वेवर महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एकूण १६३ वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती. यामध्ये सातारा विभागातील ४६, सोलापूर विभागातील ३६, पुणे विभागातील २०, सांगली विभागातील १८, कोल्हापूर विभागातील १३, पालघर विभागातील १२, ठाणे विभागातील ११ आणि मुंबई विभागातील ७ वाहनांचा समावेश आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, परिस्थितीचा आढावा घेऊन पर्यायी व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत होताच बस सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

04 Feb, 26 : 06:10 PM

शरद पवार सुनेत्रा पवारांच्या भेटीला, सहयोग सोसायटीमध्ये दाखल

दिल्ली दौरा रद्द करून शरद पवार बारामतीला आले. त्यानंतर आज सायंकाळी शरद पवार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी सहयोग सोसायटी या निवासस्थानी दाखल झाले. शरद पवार यांच्यासोबत यावेळी प्रतिभा पवारही होत्या. शरद पवार यांनी भेटीसाठी आलेल्या नागरिकांच्याही भेटी घेतल्या.  

सुनेत्रा पवार, श्रीनिवास पवार, जय पवार, पार्थ पवार यांच्यासह पवार कुटुंबातील इतर सदस्यही यावेळी उपस्थित होते.

04 Feb, 26 : 05:33 PM

आगीचा भडका उडणार इतक्यात टर्कीच्या विमानाचे कोलकातामध्ये इमर्जन्सी लँडिंग

काठमांठूवरून इस्तंबूलला जाणाऱ्या विमानाचा मोठा अपघात टळला. काठमांडूवरून उड्डाण केल्यानंतर हवेत असताना विमानाच्या उजव्या इंजिनमध्ये ठिणग्या उडाल्या. त्यामुळे विमानाच्या कॅप्टनने प्रसंगावधान दाखवत कोलकाता हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क केला आणि याची माहिती दिली. इंजिन पेट घेण्याची शक्यता असल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. 

04 Feb, 26 : 05:16 PM

अफगाणिस्तानकडून दोन शतकवीर! फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर ३११ धावांचे लक्ष्य

हरारेच्या मैदानात सुरु असलेल्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानच्या संघाने भारतासमोर मोठी धावसंख्या उभारली आहे. फैजल खान ११० (९३) आणि उझैरुल्लाह नियाझाई १०१ (८६) या दोन शतकवीरांच्या जोरावर अफगाणिस्तानने निर्धारित  ५० षटकात  ४ बाद ३१० धावा केल्या. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील युवा टीम इंडियाला फायनल गाठण्यासाठी ३११ धावांचे लक्ष्य गाठायचे आहे. 

04 Feb, 26 : 05:08 PM

'मनोज जरांगेंना गोळ्या घालून मारतो', धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल, धनंजय मुंडेंचाही उल्लेख

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालून मारतो, अशी धमकी देत असलेल्या एका व्यक्तीची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. दारु प्यायल्यानंतर एका व्यक्तीने जरांगे समर्थक व्यक्तीला कॉल केला आणि धमकी दिल्याची माहिती आहे. यात धमकी देणाऱ्या व्यक्तीने धनंजय मुंडे यांचाही उल्लेख केला. लोकमत या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. बीडमध्ये या संभाषण क्लिपची चर्चा रंगली आहे. 

04 Feb, 26 : 04:18 PM

पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या सर्व एस टी बसच्या फेऱ्या रद्द

पुण्यातून मुंबईला प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट आहे. एक्स्प्रेसवेवरील वाहनांच्या रांगा लागल्या आहे. मागील २२ तासांपासून या रांगा आहेत.  दरम्यान, आता मुंबईला येणाऱ्या सर्व एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. 

04 Feb, 26 : 03:58 PM

अजित दादांच्या विमान अपघाताची तातडीने चौकशी करावी – रविकांत तुपकर

अजितदादा सारख्या व्यक्ती ज्या विमानातून प्रवास करतात, त्या विमानात बिघाड कसा होतो? पायलट बदलला जातो, असे शंका निर्माण करणारे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. या अपघातांची कसून चौकशी होऊन, 'दूध का दूध, पाणी का पाणी' झाले पाहिजे. ज्यावर दोष असेल त्यांच्यावर तत्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली.

04 Feb, 26 : 03:45 PM

टीम इंडिया अव्वल, नाद करायचा नाय... 

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी आंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं जाहीर केलेल्या टी-२० क्रमावारीत भारतीय संघ अव्वल स्थानी कायम आहे. दुसरीकडे घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियाला 'व्हाईटवॉश' देऊनही पाकिस्तानला पहिल्या पाचात स्थान मिळवता आलेले नाही.

04 Feb, 26 : 03:45 PM

मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोल न आकारण्याच्या सूचना देणार; राज्यमंत्र्यांचं आश्वासन

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतुकीची अभूतपूर्व कोंडी झाली आहे. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर केमिकल टँकर उलटल्याने काल संध्याकाळी ५ वाजल्यापासून वाहतूक पार कोलमडली आहे. तब्बल २२ तास उलटून गेल्यावरही परिस्थिती पूर्वपदावर न आल्यानं प्रवासी संतापले आहेत. लहान मुलं, ज्येष्ठ मंडळी, रुग्ण यांचे प्रचंड हाल होत आहेत. अशा परिस्थितीतही एक्स्प्रेस वेवर टोल आकारला जात असल्याचं निदर्शनास येतंय. याची दखल सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी घेतली आहे. एक्स्प्रेस वेवरील टोल आकारणी थांबवण्याच्या सूचना संबंधितांना देणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली.

04 Feb, 26 : 03:35 PM

...तर भारताविरुद्धचा सामना पाकिस्तान खेळणार?

टी २० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील १५ फेब्रुवारीला होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या आपल्या भूमिकेवरून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यू-टर्न घेण्याची शक्यता आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, PCB प्रमुख आणि पाकिस्तानचे गृहमंत्री १२ फेब्रुवारीला बांगलादेशमधील सार्वत्रिक निवडणुकांनंतर आपली भूमिका बदलू शकतात. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारऐवजी बांगलादेशमध्ये लोकशाही सरकार सत्तेत आल्यास पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पलटी मारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

04 Feb, 26 : 03:34 PM

अमेरिकेशी करार म्हणजे शेतकऱ्यांना विकण्याचा सौदा : नाना पटोले

अमेरिकेत हजारो हेक्टरवर शेती केली जाते, यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यामुळे अमेरिकन सरकार शेतकऱ्यांना प्रचंड सबसिडी देते. या करारानुसार राहुल गांधींनी काल मांडलेली भूमिका खरी ठरणार आहे. देशाच्या शेतकऱ्यांचे रक्त, घाम आणि देश विकण्याचे काम नरेंद्र मोदींनी अमेरिकेशी केलेल्या करारात केले, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

04 Feb, 26 : 03:16 PM

'लाडकी बहीण' योजनेला अजितदादांचं नाव देणार का?

'लाडकी बहीण' योजनेला अजित पवारांचं नाव देण्याची मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. लाडकी बहीण योजनेबाबत अनेक मागण्या आहेत, त्याबाबत आम्ही बसून निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितलं. 

04 Feb, 26 : 03:10 PM

'शरद पवार गटाने सुनेत्राताईंचं नेतृत्व स्वीकारुन विलिनीकरण करावं'; धर्मरावबाबा आत्राम यांचं मोठं विधान

धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी अगोदरच एकत्र आल्या असतं तर बरं झालं असतं. म्हणजे दादा असताना पूर्वीही मी म्हणालो होतो विकासासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजेत. पार्टी वाढू शकते, पार्टी मजबूत होऊ शकते, त्यादृष्टीने सर्वांनी एकत्रित येऊन पुढे गेलं पाहिजे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर नेतृत्व सुनेत्राताईंकडेच राहिलं. त्यांच्या नेतृत्वातचं पुढे आपल्याला लढायचं आहे. ते विलीन होत असतील तरच पुढच्या गोष्टी आहेत. सुनेत्रा पवारांचं नेतृत्व मान्य करुनच हे विलीनीकरण व्हायला हवं. आमच्यासोबत यायचं असेल तर एनडीएसोबत गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे सुनेत्राताईंचं नेतृत्व मान्य करावं लागेल. 

04 Feb, 26 : 02:54 PM

बुलढाणा : पाण्यासाठी रायपूरच्या महिलांचा जिल्हा परिषदेत आक्रोश

बुलढाणा जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या रायपूर गावात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. महाजल तसेच जलजीवन मिशनसारख्या योजनांअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रत्यक्षात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार ग्रामस्थ महिलांनी केली आहे. 

महिलांच्या म्हणण्यानुसार, तब्बल दोन महिन्यांनंतर पाणी मिळत असून त्यामुळे दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले आहे. किमान आठ दिवसाआड तरी पाणीपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी शेकडो महिला आज जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंतांच्या दालनात धडकल्या.

04 Feb, 26 : 02:47 PM

आयआयटीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; वसतिगृहाच्या छतावरून उडी मारली

आयआयटीचा विद्यार्थी नमन अग्रवाल (२१ वर्षे) हा बी.टेक (सिव्हिल इंजिनिअरिंग) च्या दुसऱ्या वर्षात शिकत होता, त्याने वसतिगृह क्रमांक ४ च्या छतावरून उडी मारून आयुष्य संपवले. तो राजस्थानमधील पिलानी येथील रहिवासी होता. पुढील तपास सुरू आहे.

04 Feb, 26 : 02:06 PM

पंढरपुरात खताच्या दुकानाला भीषण आग; सर्व साहित्य जळून खाक

पंढरपूर शहरातील अर्बन बँकेच्या पाठीमागे असलेल्या ओम अ‍ॅग्रो या खताच्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. दोन मजली असलेल्या या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.

04 Feb, 26 : 02:06 PM

नवापूर एमआयडीसीत स्थानिकांवर अन्याय; १२ फेब्रुवारीला आंदोलनाचा इशारा

नवापूर तालुक्यातील एमआयडीसी परिसरातील विविध उद्योगांमध्ये स्थानिक आदिवासी तसेच स्थानिक युवकांना रोजगार न देता मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगारांना नोकऱ्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आणि स्थानिक नागरिकांनी केला आहे. या प्रकारामुळे परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून योग्य कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

04 Feb, 26 : 02:02 PM

"तुझ्या मुख्यमंत्र्याला जाऊन विचार, सुहास बाबर कोण आहे?"

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर हे भाजपाच्या स्थानिक नेत्यावर टीका करताना थेट मुख्यमंत्र्यांवरच घसरले. तुझ्या मुख्यमंत्र्याला जाऊन विचार, सुहास बाबर कोण आहे? अरे तुझा मुख्यमंत्री माझ्यासारखे २४२ (आमदार) आहेत म्हणून मुख्यमंत्री आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपाला आव्हान दिलं. (वाचा संपूर्ण बातमी)

04 Feb, 26 : 01:44 PM

ठाण्यात विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटालाच – मनोज प्रधान

विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांनाच मिळणार असल्याचा दावा ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे अध्यक्ष मनोज प्रधान यांनी केला आहे. मनोज प्रधान म्हणाले की, नियमांनुसार ज्या पक्षाकडे दुसऱ्या क्रमांकाचे संख्याबळ असते, त्याच पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)कडे १२ नगरसेवक असल्याने आमच्याच पक्षाचा विरोधी पक्षनेता बसेल, असा ठाम दावा त्यांनी केला.
 

04 Feb, 26 : 01:29 PM

Video: पाय घसरला आणि संसदेच्या पायऱ्यांवर शशी थरूर पडले

काँग्रेसचे खासदार शशी थरूर हे संसदेतून बाहेर पडत होते. पायऱ्यांवरून ते उतरत होते. त्याचवेळी त्यांचा पाय घसरला आणि तोल गेला. ते खाली पडले. त्यानंतर आजूबाजूला असलेले खासदार आणि कर्मचारी तिथे आले. त्यांनी शशी थरूर यांना उठवले. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने ते चालत गेले. 

04 Feb, 26 : 01:24 PM

NCP विलीनीकरणावर सुनील तटकरेंचा मोठा दावा

शपथविधीची घाई का झाली याबद्दल अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. तसं विलीनीकरणाची चर्चासुद्धा स्व. अजितदादांवर अंत्यविधी होण्यापूर्वी का कुणी सुरू केली, सतत मुलाखतींचा फेऱ्या का सुरू ठेवल्या त्यामागे कारणे काय होती? विलीनीकरण ही धोरणात्मक बाब आहे परंतु त्याचा उपमुख्यमंत्रिपदाचा, विधिमंडळ नेतेपदाचा कसा दुरान्वये संबंध येतो हे मला राजकीय कुणी समजून सांगितले तर नक्कीच मी त्यावर भूमिका मांडेन. जो व्हिडिओ फिरवला जातोय, त्यानंतर अजितदादांचा मला फोन आला होता असं सांगत सुनील तटकरे यांनी विलीनीकरणावरून मोठा दावा केला. (वाचा संपूर्ण बातमी)

04 Feb, 26 : 01:07 PM

आयआयटीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; वसतिगृहाच्या छतावरून उडी मारली

आयआयटीचा विद्यार्थी नमन अग्रवाल (२१ वर्षे) हा बी.टेक (सिव्हिल इंजिनिअरिंग) च्या दुसऱ्या वर्षात शिकत होता, त्याने वसतिगृह क्रमांक ४ च्या छतावरून उडी मारून आयुष्य संपवले. तो राजस्थानमधील पिलानी येथील रहिवासी होता. पुढील तपास सुरू आहे.

04 Feb, 26 : 12:59 PM

पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांना सुचवले दोन पर्यायी मार्ग

रसायन वाहून नेणारा टँकर आडोशी बोगद्याजवळ उलटल्यामुळे गेल्या १५ ते १७ तासांपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतुकीचा पार बोजवारा उडाला आहे. टँकरमधील वायुगळती पूर्ण थांबेपर्यंत मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्ववत होणं कठीणच आहे. अशा परिस्थितीत, मुंबईकडे येऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांना महामार्ग पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी पर्याय सुचवला आहे.

04 Feb, 26 : 12:36 PM

येवला बाजार समितीत कांद्याचे दर कोसळले; प्रतिक्विंटल ३०० ते ४०० रुपयांची घसरण

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर घसरले असून, भावात प्रतिक्विंटल ३०० ते ४०० रुपयांची मोठी घसरण झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या सरासरी दरात सातत्याने घट होत असल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. भाव कोसळल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

04 Feb, 26 : 12:22 PM

लोकसभेत घोषणाबाजी, गोंधळ! विरोधक हौद्यात उतरले, सभापती चिडले

भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल सविस्तर निवेदन करत असताना विरोधकांची जोरदार घोषणाबाजी. करारामुळे भारतीय शेतकऱ्यांच्या हिताला कुठलाही धक्का लागणार नसल्याची सरकारची ग्वाही. मात्र, हा करार शेतकरीविरोधी असल्याचा 'इंडिया'चा आरोप. हौद्यात उतरून जोरदार घोषणाबाजी. सभापती ओम बिर्ला यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आणि विरोधकांची कानउघाडणी करत कामकाज स्थगित केलं. 

04 Feb, 26 : 12:02 PM

आजोबा-नातवांची बैठक नेमकी कशासाठी?

अजित पवारांचे चिरंजीव पार्थ आणि जय यांची आज शरद पवारांसोबत महत्त्वाची बैठक सुरू आहे. विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीनंतर आजोबा आणि नातवांची ही खासगी बैठक सुरू असून त्यातील चर्चेबद्दल उत्सुकता आहे. अजितदादा अनेक संस्था, संघटनांचे पदाधिकारी होते. माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे संचालक, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष, विद्या प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त यासारखी पदं अजित पवार सांभाळत होते. ही जबाबदारी आता कशी, कुणाकडे द्यायची याबाबत पवार कुटुंबीय निर्णय घेणार असल्याचं समजतं. त्यासोबतच, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा पुढे जाणार का, याबाबतही तर्क लढवले जात आहेत. 

04 Feb, 26 : 11:45 AM

मुंबई: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पश्चिम रेल्वेची चर्चगेटच्या दिशेची वाहतूक विस्कळीत झाली असून लोकल २० ते २५ मिनिटं उशिराने धावत आहेत. यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. दादर स्थानकावरील गर्दीची दृश्य...

04 Feb, 26 : 11:34 AM

भारत-अमेरिका व्यापार करारातील एका गोष्टीची शरद पवारांना चिंता

"कृषी क्षेत्रात अमेरिकेला निर्यात करता येईल अशी तरतूद व्यापार करारात आहे. ही तरतूद भारतातील कृषी क्षेत्राच्या दृष्टीने चिंता करण्यासारखी आहे. अमेरिका हा शक्तीशाली देश आहे. आर्थिक ताकद त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी एखाद्या क्षेत्रातील उत्पादनाची निर्यात इतर देशात करायची ठरवली तर त्या देशाच्या त्या क्षेत्रातील उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. ती स्थिती भारतीय शेतीच्या बाबतीत येऊ नये अशी अपेक्षा आहे. दोन दिवसांत चित्र स्पष्ट झाल्यावर त्याबाबत अधिक भाष्य करणे योग्य होईल"- शरद पवार (वाचा संपूर्ण बातमी)

04 Feb, 26 : 11:06 AM

"प्रफुल्ल पटेलांनी चिडचिड करू नये"

अजित पवारांनी भाजपसोबत जाताना आपले विचार खुंटीला टांगले नाहीत. अजित पवार राष्ट्रवादी चालवत होते. पटेल हे मोदी - शाह यांचे भक्त आहेत. पटेलांना पवार कुटुंबाचा मुखिया केलं आहे का? यांनी चिडचिड करू नये: शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचा टोला

04 Feb, 26 : 10:48 AM

११ फेब्रुवारीला मुंबईला मिळणार नवा महापौर, उपमहापौर

येत्या ११ फेब्रुवारीला होणाऱ्या मुंबई महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी येत्या शनिवारी, ७ फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. उमेदवारी अर्ज सादर झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी १५ मिनिटे आधी अर्ज मागे घेण्याची संधी उमेदवाराला दिली जाणार आहे. ही निवडणूक आवाजी पद्धतीने हात उंचावून घेतली जाणार आहे. पीठासीन अधिकारी म्हणून पालिका आयुक्त भूषण गगराणी हे कामकाज सांभाळणार आहेत.

04 Feb, 26 : 10:38 AM

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अडकलेल्या प्रवाशांची हतबलता, उद्विग्नता...

04 Feb, 26 : 10:35 AM

घातपाताच्या चर्चेदरम्यान शरद पवारांचं मोठं विधान

"अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबत फार सुरुवातीला मी बोललोय. जोवर माझ्यापर्यंत कुठलीही अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत मी अपघाताबाबत उगीच शंका घेणार नाही" - शरद पवार

04 Feb, 26 : 10:24 AM

मृत्यूच्या ९ मिनिटांपूर्वी अजितदादांचा कार्यकर्त्याला कॉल; अखेरचं काय बोलले?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपघातापूर्वी कार्यकर्त्याला केलेला अखेरचा कॉल रेकॉर्ड समोर आला आहे. अपघाताच्या दिवशी सकाळी ८ वाजून ३७ मिनिटांनी दादांचा हा अखेरचा कॉल कार्यकर्त्याला आला होता. हा कॉल रेकॉर्ड बारामतीत पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ऐकवला. अखेरच्या कॉलवर अजितदादांनी, 'सर्व जातीधर्माला मी सोबत घेऊन जातोय आणि आपण सगळे एकत्र राहतोय. सगळ्यांना न्याय देण्याचं आपण नक्की काम करू. तू निवांत राहा असं म्हटलं होतं. (वाचा संपूर्ण बातमी

04 Feb, 26 : 10:21 AM

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर २० किमीपर्यंत लांब रांगा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गॅस टँकर उलटल्यानं काल संध्याकाळपासून मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. अद्यापही ती पूर्वपदावर आलेली नाही. ती सुरळीत करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अजूनही एक्स्प्रेस वेवर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत, प्रचंड वाहतूक कोंडीत शेकडो वाहनं अडकून पडली आहेत. पुण्याकडून मुंबईकडे जाणारा प्रोपिलिन गॅसचा टँकर आडोशी बोगद्याजवळ उलटला. त्यातून काही काळ गॅसगळती झाल्यानं परिसरात घबराट पसरली होती. त्यामुळेच सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे येणारी सर्व वाहतूक तातडीने थांबवण्यात आली होती.

Web Title: Maharashtra Marathi News Live Updates: 4 February 2026: Lok Sabha, Parliament Session, Rahul Gandhi, Narendra Modi, BMC mayor, Sharad Pawar on NCP merger, Devendra Fadnavis, Ajit Pawar Death, Sunetra pawar