Latest Marathi News Live Updates: अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास कुठपर्यंत?, AAIBच्या रिपोर्टमध्ये काय?
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 22:59 IST2026-02-17T08:31:37+5:302026-02-17T22:59:19+5:30
Todays Breaking Maharashtra News Live Updates in Marathi: महाराष्ट्रासह देश - विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

Latest Marathi News Live Updates: अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास कुठपर्यंत?, AAIBच्या रिपोर्टमध्ये काय?
Todays Breaking Maharashtra News Live Updates in Marathi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येणार आहेत. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन यांच्यासोबत त्यांची बैठक होणार असून त्यात भारत - फ्रान्स मैत्रीचं नवं पर्व सुरू होईल, असं म्हटलं जातंय. मोदींच्या मुंबई भेटीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. केंद्रात भारत - अमेरिका व्यापार करारावरून विरोधकांचे आरोप सुरू आहेत, तर महाराष्ट्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी टिपू सुलतानबाबत केलेलं विधान वादाचा विषय ठरलं आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेनेही ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे कांगारूंचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे.
LIVE
17 Feb, 26 : 10:54 PM
छत्रपती संभाजीनगरात ‘बुक बँक’ उपक्रमाची मुहूर्तमेढ
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ‘दशसूत्री’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी ‘बुक बँक’ ही संकल्पना राबवण्याची घोषणा केली आहे.
17 Feb, 26 : 10:53 PM
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात संतोष गर्जे आणि प्रिती गर्जे यांनी माळरानावर कृषीग्राम नावाचं नंदनवन फुलवलं आहे. सहारा अनाथालयाच्या माध्यमातून अनाथ मुलांना मायेचा आसरा देणाऱ्या या दाम्पत्यांनी कृषीग्रामच्या माध्यमातून दुष्काळातल्या शेतकऱ्यांना शेतीतील आदर्श घालून दिला.
17 Feb, 26 : 10:52 PM
अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास कुठपर्यंत?, AAIBच्या रिपोर्टमध्ये काय?
17 Feb, 26 : 10:51 PM
तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याचा खून; चाैघांनाही पाच दिवसांची कोठडी!
लातूर : औसा राेडवरील पुरणमल लाहोटी शासकीय मुलांच्या वसतिगृह प्रवेशद्वारावरच सोमवारी सायंकाळी किरकोळ वादातून एका २१ वर्षीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या हल्ल्यामध्ये इतर तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. अटकेतील चारही आराेपींना मंगळवारी दुपारी लातूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २१ फेब्रुवारीपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली.
17 Feb, 26 : 10:15 PM
हक्कभंग समितीच्या बैठकीत काय घडलं, प्रसाद लाड यांनी सगळं सांगितलं..
17 Feb, 26 : 10:13 PM
कर्मचारी राज्य विमा संस्थेशी संलग्न ५१७ डॉक्टर वर्षभर मानधना पासून वंचित
राज्य शासन अंतर्गत कर्मचारी राज्य विमा संस्थेशी संलग्न राज्यातील ५१७ डॉक्टरांना जानेवारी २०२५ पासून जानेवारी २०२६ पर्यंतचे मानधन अजूनही मिळालेले नाही. कामगारांची लाईव्ह लिस्ट नसल्याचे कारणाने गेल्या काही वर्षां पासून डॉक्टरांना मानधन वेळेत दिले जात नसून यामुळे कामगारांना देखील वैद्यकीय उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत.
17 Feb, 26 : 10:09 PM
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांना पितृशोक, दिल्लीत अंत्यसंस्कार
बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांचे वडील सुनील मल्होत्रा यांचे निधन झाले आहे. कुटुंबातील जवळच्या सदस्यांच्या उपस्थितीत दिल्लीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
17 Feb, 26 : 09:17 PM
आधी निवडणुकीत बाजी अन् आता PM मोदींच्या स्वागताची संधी; नगसेविका तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या…
ज्यांच्या दूरदर्शी आणि ठाम नेतृत्वामुळे भारत आज जागतिक पातळीवर प्रत्येक क्षेत्रात नवी उंची गाठत आहे, ते देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या स्वागताची सुवर्णसंधी आज मला लाभली. ही माझ्यासाठी केवळ औपचारिक भेट नाही, तर आयुष्यभर जपून ठेवावी अशी प्रेरणादायी ऊर्जा… pic.twitter.com/1iL6Njqyry
— Tejasvee Abhishek Ghosalkar (@tejasvee27) February 17, 2026
17 Feb, 26 : 09:15 PM
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सुनील तटकरेंच्या भेटीला, काय चर्चा झाली?
17 Feb, 26 : 09:06 PM
टिपू सुलतान यांचे नाव हटवण्यावरून भाजपावर विरोधी पक्षांची टीका
स्वतःचे अपयश लपवण्यासाठी जात, भाषिक आणि धर्माच्या आधारे मीरा भाईंदर शहर पेटवण्याचे घाणेरडे राजकारण स्थानिक भाजपा करत आहे. स्वतःच टिपू सुलतानाचे नाव देण्याचा ठराव करायचा आणि लोकांना भडकवण्यासाठी पुन्हा जाती - धर्मात लढवण्यासाठी दिलेले नाव रद्द करण्याचा स्वतःच प्रस्ताव आणायचा अशी टीका शिंदेसेना, मनसे सह काँग्रेस व अन्य पक्षांनी भाजपावर केली आहे.
17 Feb, 26 : 08:52 PM
बेलापूरमध्ये हजारो झोपडपट्टीधारकांना मोफत घरांचा दिलासा
नवी मुंबईतील बेलापूर भागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जुन्या झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्याची माहिती आमदार मंदा म्हात्रे यांनी दिली. राज्याचे पुनर्वसन मंत्री पंकज भोयर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर बेलापूरमधील हजारो जुन्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
17 Feb, 26 : 08:39 PM
चोपडा नगरपरिषदेची निवडणुकीनंतर पहिली विशेष सभा संपन्न
चोपडा नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर निवडून आलेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची कामकाजासंदर्भातील पहिली विशेष सभा संपन्न झाली. चोपडा नगरपरिषदेचा कार्यकाळ डिसेंबर २०२१ मध्ये संपल्यानंतर प्रशासक नेमण्यात आला होता. साडेचार ते पाच वर्षांच्या प्रशासकीय कामकाजानंतर डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या निवडणुकीत नवीन नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आले.
17 Feb, 26 : 08:38 PM
विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार श्रीनिवास कुलकर्णी यांना जाहीर
साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास दिला जाणारा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार’ यंदा श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. साहित्य निर्मिती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत प्रकाशन संस्थेला दिला जाणारा पुरस्कार यंदा निर्मल प्रकाशन, नांदेड यांना जाहीर झाला आहे.
17 Feb, 26 : 08:37 PM
कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल, कांद्याचे भाव गडगडले... शेतकऱ्यांनी करावे तरी काय?
17 Feb, 26 : 08:01 PM
हक्कभंग समिती समोर कुणाल कामरा, विधानभवनात काय घडलं?
17 Feb, 26 : 08:00 PM
परभणी येथील काझी हुसेमा मो. नजमोद्दीन ठरली महाराष्ट्राचा महावक्ता – २०२६ स्पर्धेची महाविजेती
प्रबोधन गोरेगाव आणि फन लीडर्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्ष ११ वे ‘महाराष्ट्राचा महावक्ता – २०२६’ राज्यस्तरीय मोफत खुली वक्तृत्व स्पर्धा दिनांक १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रबोधन क्रीडाभवन, सिद्धार्थ नगर, गोरेगाव (प.), मुंबई येथे उत्साहपूर्ण आणि स्पर्धात्मक वातावरणात पार पडली. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक परभणी येथील काझी हुसेमा मो. नजमोद्दीन यांनी पटकाविले. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि २१,००० रुपये रोख असे या पारितोषिकाचे स्वरूप होते. द्वितीय क्रमांक (१५,००० रु.) कार्तिक दराडे (उदगीर), तर तृतीय क्रमांक (११,००० रु.) लक्ष्मण कचरे (महाड) यांनी मिळवला.
17 Feb, 26 : 06:14 PM
प्रविणा देशपांडे यांचं निधन, 'तस्करी' सीरिज शेवटची ठरली
ज्येष्ठ अभिनेत्री प्रविणा देशपांडे यांचं निधन झालं आहे. मराठी आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीत त्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये दिसल्या. मालिका, सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं. काही वर्षांपूर्वी त्यांना ब्लड कॅन्सर झाला होता ज्यावर त्यांनी मात केली होती. २०२३ मध्ये त्या पुन्हा काम करायला लागल्या होत्या. मात्र आता ६० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
17 Feb, 26 : 06:11 PM
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची मुंबईत भेट
भारताच्या संरक्षण सिद्धतेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची आज मुंबईतील 'लोकभवन' येथे महत्त्वाची भेट झाली. या भेटीत दोन्ही देशांच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले असून, तब्बल ११४ राफेल फायटर जेट्स आणि शक्तिशाली हॅमर मिसाईलच्या खरेदीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
🇮🇳🇫🇷 pic.twitter.com/ACBDaxbHxg
— Emmanuel Macron (@EmmanuelMacron) February 17, 2026
17 Feb, 26 : 04:05 PM
रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबाराची इनसाईड स्टोरी
रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबाराचं गूढ हळूहळू उलगडत आहे. या खळबळजनक घटनेमागे एका सुनियोजित कटाचा खुलासा झाला आहे. तपासात समोर आलं आहे की, आधी घराची रेकी करण्यात आली आणि त्यानंतर ठरलेल्या प्लॅननुसार गोळीबार करण्यात आला. घटनेनंतर आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी लपले होते. पोलिसांनी अनेक राज्यांमध्ये छापे टाकून आरोपींना अटक केली असून आता त्यांच्या संपूर्ण नेटवर्कचा शोध घेतला जात आहे. वाचा सविस्तर
17 Feb, 26 : 03:28 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल; इमॅन्युएल मॅक्रॉन यांना भेटण्यासाठी लोकभवनात पोहोचले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. त्यांच्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यादरम्यान, मॅक्रॉन गुरुवारी दिल्लीत होणाऱ्या एआय समिटमध्येही सहभागी होतील.
17 Feb, 26 : 02:56 PM
कुणाल कामरा, सुषमा अंधारे १० मार्चला हक्कभंग समितीसमोर हजर होणार
एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि विडंबनात्मक गाणे म्हटल्याबद्दल कॉमेडियन कुणाल कामरा याच्यावर तसेच सुषमा अंधारे यांंच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला होता. त्याबाबत आज हक्कभंग समितीपुढे जबाब नोंदवण्यात येणार होता. पण मूळ तक्रारदार प्रवीण दरेकर नसल्याने आता ही सुनावणी १० मार्चला होणार आहे.
17 Feb, 26 : 02:51 PM
"भाजपाने टिपू सुलतान विरोधात आंदोलन केलं आणि हिंदूंची डोकी फोडली", रवींद्र धंगेकर यांची महापौरांवर टीका
माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यात भाजपाने केलेल्या आंदोलनात दगडफेक झाल्याच्या मुद्द्यावरून महापौर मंजुषा नागपुरे यांच्यावर 'महापौर हे वागणं बरं नव्ह...' म्हणत निशाणा साधला.
"भाजपने टिपू सुलतान विरोधात आंदोलन केलं आणि आंदोलनात हिंदूंची,बहुजनांची डोकी फोडली. विशेष म्हणजे पुण्यनगरीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुण्यनगरीच्या प्रथम नागरिक महापौर मंजुषा नागपुरे या आंदोलनाचे नेतृत्व करत होत्या. महापौर या पदाकडे कुठल्या पक्षाची व्यक्ती म्हणून नाही तर पुण्याचे महापौर म्हणून आपण पाहतो. त्या व्यक्तीने अशा प्रकारच्या राजकीय आंदोलनांना सहभागी होणे आणि त्यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात पुणेकरांची डोकी फुटणे, याचा अर्थ हे वर्तन कुठेतरी चुकतंय", अशी टीका धंगेकर यांनी केली.
"पुणे शहर शिव,शाहू, फुले ,आंबेडकर यांच्या विचारांना मानणारे शहर आहे.आपल्या पुण्याची राजकीय संस्कृती तमाम देशभरात कौतुकाचा विषय असते. इथल्या वेगवेगळ्या कट्ट्यांनी शेजारी शेजारी कट्टर राजकीय विरोधक बसवून चर्चा घडवून आणली आहे. आपल्या पुण्याचा राजकीय इतिहास डोकी फोडणारा बिलकुल नाही त्यामुळे बाकीच्यांकडून तर काही अपेक्षा नाहीत परंतु किमान पुण्यनगरीच्या महापौर पदावर असलेल्या व्यक्तीकडून पुणेकरांना मोठ्या अपेक्षा आहेत", असा टोलाही धंगेकर यांनी महापौर नागपुरे यांना लगावला.
महापौर हे वागणं बरं नव्ह...!
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) February 17, 2026
भाजपने टिपू सुलतान विरोधात आंदोलन केलं आणि आंदोलनात हिंदूंची,बहुजनांची डोकी फोडली. विशेष म्हणजे पुण्यनगरीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुण्यनगरीच्या प्रथम नागरिक महापौर मंजुषा नागपुरे या आंदोलनाचे नेतृत्व करत होत्या. महापौर या पदाकडे कुठल्या पक्षाची… pic.twitter.com/K7hf1Gvetg
17 Feb, 26 : 02:44 PM
ब्लॅक बॉक्ससंदर्भात रोहित पवार यांचं मोठं विधान
रोहित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता त्याना अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅकबॉक्सबाबत विचारण्यात आले. तेव्हा रोहित पवार म्हणाले की, विमानातील ब्लॅक बॉक्स हा पावसापासून, उन्हापासून, आगीपासून, बॉम्बस्फोटापासून सुरक्षित आहे. पण राजकारण्यांपासून सुरक्षित नाही. आता याच्यामध्ये काय राजकारण चाललं आहे, हे आपल्याला बघावं लागेल. त्याच्या खोलामध्ये जावं लागेल. दरम्यान, उद्या अधिक खोलात जाऊन या घटनेवेळी काय घडलं असावं, कुठल्या नवीन गोष्टी आमच्यापर्यंत आल्या आहेत, त्या आम्ही तुमच्यासमोर आणणार आहोत.
17 Feb, 26 : 01:24 PM
अजित पवार विमान दुर्घटना: २० दिवसांनंतरही तपास शून्य!
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज २० दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्याप या प्रकरणाचा तपास संथ गतीने सुरू असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. "सामान्य जनतेला अजितदादांची किंमत कळली आहे, पण तपास यंत्रणांना अजून जाग का येत नाही?" असा बोचरा सवाल करत त्यांनी या प्रकरणामागे काही खाजगी हितसंबंध जपले जात आहेत का, अशी शंका उपस्थित केली आहे.
17 Feb, 26 : 12:44 PM
दोन्ही रेकॉर्डरचे आगीत नुकसान, परदेशी तज्ज्ञांची घेणार मदत
अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स सापडला होता. मात्र आगीत हा ब्लॅक बॉक्स जास्तच जळाल्याचे समोर आले. आता नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने पहिल्यांदाच या अपघाताविषयी अधिकृत माहिती दिली आहे. विमानात दोन स्वतंत्र फ्लाइट रेकॉर्डर होते, ज्यात एक डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर (DFDR) आणि एक कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) यांचा समावेश आहे. अपघातादरम्यान दोन्ही रेकॉर्डर दीर्घकाळ उच्च तापमानात होती आणि आगीमुळे त्यांचे नुकसान झाले असं त्यांनी माहिती दिली. त्यामुळे डेटा रिकव्हरी करण्यासाठी दुसऱ्या देशाची मदत घेतली जाणार आहे.
17 Feb, 26 : 11:54 AM
फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी संशयित गोपाळ बदनेचा जामीन अर्ज फेटाळला
साताऱ्यातील फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी तथा बडतर्फ फौजदार गोपाळ बदने याचा जामीन अर्ज फलटण न्यायालयाने फेटाळला आहे. फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी गोपाळ बदने या बडतर्फ फौजदाराने जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. मात्र, या प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याने न्यायालयीन कोठडीत असलेल्या गोपाळ बदने याचा जामीन अर्ज फलटण न्यायालयाने फेटाळला आहे.
17 Feb, 26 : 11:53 AM
मंत्रिपदावरून काढण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील -झिरवळ
कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला लाच घेताना अटक करण्यात आली. त्यामुळे झिरवळ अडचणी आले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असून, झिरवळ यांनी यावर खुलासा केला आहे.
"माझ्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेतील. कुणाला मंत्रिपद द्यावे आणि काढावे, हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. त्यामुळे सर्व निर्णय ते घेतील. बाकी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात माझे कोणाही वैरी नाहीत", अशी भूमिका झिरवळ यांनी मांडली आहे.
17 Feb, 26 : 11:10 AM
मंत्रालयात घडलेला लाचखोरीचा प्रकार कलंक लावणारा- मंत्री झिरवाळ
मंत्रालयात घडलेला लाचखोरीचा प्रकार हा कलंक लावणारा आहे. या प्रकरणातील आरोपी ढेरिंगे यांची चौकशी सुरु झाली आहे. लवकरच यामागचे सत्य समोर येईल. लाचखोरी प्रकरणात योग्य ती कारवाई केली जाईल, असे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
17 Feb, 26 : 10:31 AM
मुलुंड मेट्रो अपघातावर अमित ठाकरेंची पोस्ट
शून्य… हीच आहे आपल्या आयुष्याची किंमत!!! असं म्हणत मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मुलुंड मधील मेट्रो बांधकामाच्या ठिकाणी घडलेल्या अपघातावर भाष्य केलं आहे.
17 Feb, 26 : 10:26 AM
पार्थ चुकीचे काम करणार नाही, सुप्रिया सुळेंनी पुन्हा दाखवला विश्वास
पुण्यातील जमीन प्रकरणाची बातमी चॅनेलवर आली, तेव्हा मी पार्थला फोन केला होता. त्याने मला सांगितले, आत्या मी काही चुकीचे केले नाही. मी तुम्हाला नंतर समजावून सांगतो काय झाले ते..असं त्याने मला सांगितल्यावर मी त्याच्यावर विश्वास ठेवला. या प्रकरणाचा चौकशी अहवाल येईपर्यंत वाट पाहू. पण त्यावेळीच पार्थवर विश्वास ठेवून मी प्रतिक्रिया दिली होती. आपण ज्या मुलाला जन्मापासून पाहिले आहे ज्यांच्यावर आमच्या घरातील संस्कार झालेत. त्यामुळे माझा विश्वास आणि अपेक्षा आमच्या घरातील मुला आणि मुलींकडूनही आहेत. ते कुठलेही चुकीचे काम करणार नाही - सुप्रिया सुळे
17 Feb, 26 : 09:45 AM
मालवणच्या समुद्रात 75 डॉल्फीन माशांचा विहार
सिंधुदुर्गच्या अथांग दर्याची जैवविविधता किती श्रीमंत आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा मालवणच्या चिवला बीचवर आला. समुद्रामध्ये चक्क ७५ हून अधिक 'इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिन्स'चा एक विशाल समूह एकाच वेळी बागडताना दिसून आला. लाटांच्या तालावर ताल धरत. अधूनमधून पाण्यातन उंच झेप घेणाऱ्या या जलराण्यांचा 'रास' पाहून निसर्गप्रेमी आणि संशोधक भारावून गेले आहेत. सागरी जीव संशोधक डॉ. विशाल भावे आणि त्यांच्या चमूने 'सरगॅसम' समुद्री शैवाल प्रकल्पाचे सर्वेक्षण करत असताना, हा अद्भुत नजारा ड्रोन कॅमेऱ्यात कैद केला.
कोकणावर देवाने निसर्गाच्या माध्यमातून मुक्त हस्ताने उधळण केल्याचे आपण नेहमीच ऐकतो आणि बघतो. इथला निसर्ग जसा सौंदर्याने नटलेला आहे तसेच इथले समुद्र किनारे ही.. त्यामुळे पर्यटकांना इथली नेहमीच भुरळ पडत असते. सिंधुदुर्गच्या निसर्गसंपन्नतेत चार चाँद लावणारी गोष्ट समोर आली आहे.… pic.twitter.com/tQGzozOh6i
— Nitesh Rane (@NiteshNRane) February 17, 2026
17 Feb, 26 : 09:45 AM
ठाण्यात इमारतीचा स्लॅब कोसळला, ३ जखमी; ८० जणांना काढले बाहेर
ठाण्यातील वागळे इस्टेट शांती नगर येथील ३०-३५ वर्षे जुन्या नुतन निलम या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्दैवी घटना घडली. या घटनेत तीन जण जखमी झाले असून, ८० जणांना बाहेर काढण्यात यश आले. मंगळवारी पहाटे पाच वाजता ही घटना घडली. पाचव्या मजल्यावरून इमारतीचे छत थेट चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये कोसळले.
17 Feb, 26 : 09:09 AM
पार्थ पवारांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा! जमीन घोटाळ्यात खारगे समितीकडून क्लीन चिट
पुण्यातील १८०० कोटी रुपये किंमत असलेली जमीन ३०० कोटी रुपयांमध्ये पार्थ पवार यांच्या कंपनीकडून खरेदी केली गेली होती. प्रकरण समोर आल्यानंतर हा व्यवहार रद्द करण्यात आला आणि राज्य सरकारने महसूल सचिव विकास खारगे यांची समिती नियुक्त केली होती. या समितीचा अहवाल राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर करण्यात आला असून, त्यात पार्थ पवार यांना अभय दिले गेले आहे. त्यामुळे पार्थ पवार यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा रंगली आहे.
17 Feb, 26 : 09:09 AM
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन मुंबईत दाखल
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन हे आजपासून (१७ फेब्रुवारी) १९ फेब्रुवारीपर्यंत भारत दौऱ्यावर आहेत. मंगळवारी मध्य रात्री त्यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदीही मुंबईत असणार असून, दिल्लीत होत असलेल्या एआय इम्पॅक्ट समिटमध्येही इमॅन्युएल मॅक्रोन सहभागी होणार आहेत.
MEA के प्रवक्ता रणधीर जायसवाल ने ट्वीट करते हुए लिखा, "फ्रांस के राष्ट्रपति इमैनुएल मैक्रों का गर्मजोशी से स्वागत किया गया। महाराष्ट्र और गुजरात के गवर्नर आचार्य देवव्रत ने मुंबई एयरपोर्ट पर उनका गर्मजोशी से स्वागत किया...इस दौरे के दौरान, PM नरेंद्र मोदी फ्रांस के राष्ट्रपति… pic.twitter.com/ve0K18pUyE
— ANI_HindiNews (@AHindinews) February 16, 2026