Maharashtra Lok Sabha election results 2019: Congress-NCP's dream is broken due to the Vanchit Bahujan Aaghadi | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: वंचित बहुजन आघाडीमुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीचं स्वप्न भंगलं 
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: वंचित बहुजन आघाडीमुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीचं स्वप्न भंगलं 

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा संपुष्टात आली असून देशात एनडीएची सत्ता येईल हे निश्चित झालं आहे. राज्यातही शिवसेना-भाजपा युतीनेही अभूतपूर्व यश मिळवत पुन्हा एकदा काँग्रेस-राष्ट्रवादीला धोबीपछाड दिली आहे. मागील निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागले. अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, शिवाजीराव आढळराव पाटील, राजू शेट्टी, अनंत गीते अशा दिग्गज नेत्यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. मात्र राज्यातील राजकारणात शिवसेना-भाजपा यशाचा फॅक्टर वंचित बहुजन आघाडी ठरल्याचं दिसून येतं. अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने खाल्लेल्या मतांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

वंचित बहुजन आघाडीला मिळालेली मते 

 • अहमदनगर - सुधाकर आव्हाड - 30 हजारांहून अधिक 
 • अकोला - प्रकाश आंबेडकर - 2 लाख 50 हजारांहून अधिक
 • अमरावती - गुणवंत देवपरे - 60 हजारांहून अधिक 
 • बारामती - नवनाथ पडळकर - 40 हजारांहून अधिक 
 • बीड - प्रा. विष्णू जाधव - 90 हजारांहून अधिक 
 • भंडारा-गोंदिया - के. एन. नान्हे - 35 हजारांहून अधिक
 • भिवंडी - प्रा. अर्जुन सावंत - 45 हजारांहून अधिक 
 • बुलडाणा - भगवान शिरसकर - 1 लाख 50 हजारांहून अधिक 
 • चंद्रपूर - अँड. राजेंद्र महाडोळे - 70 हजारांहून अधिक 
 • धुळे - नाबी अहमद दुल्ला - 35 हजारांहून अधिक 
 • दिंडोरी - बापू बेर्डे - 55 हजारांहून अधिक 
 • गडचिरोली - डॉ. रमेशकुमार गजबे - 1 लाखांहून अधिक 
 • हातकणंगले - अस्लम सय्यद - 1 लाख 10 हजारांहून अधिक 
 • हिंगोली - मोहन राठोड - 1 लाख 40 हजारा्ंहून अधिक 
 • जळगाव - अंजली बाविस्कर - 35 हजारांहून अधिक 
 • जालना - डॉ. शरदचंद्र वानखेडे - 75 हजारांहून अधिक 
 • कल्याण - संजय हेडाऊ - 55 हजारांहून अधिक 
 • कोल्हापूर - डॉ. अरुण माळी - 60 हजारांहून अधिक 
 • लातूर - राम गारकर - 1 लाखांहून अधिक 
 • माढा - विजय मोरे - 50 हजारांहून अधिक 
 • मावळ - राजाराम पाटील - 75 हजारांहून अधिक 
 • दक्षिण मुंबई - अनिल कुमार - 30 हजारांहून अधिक 
 • उत्तर मध्य मुंबई - अब्दुर अंजारिया - 30 हजारांहून अधिक 
 • ईशान्य मुंबई - निहारिका खोंदले - 65 हजारांहून अधिक 
 • दक्षिण मध्य मुंबई - संजय भोसले - 60 हजारांहून अधिक 
 • नांदेड - यशपाल भिंगे - 1 लाख 60 हजारांहून अधिक 
 • नाशिक - पवन पवार - 90 हजारांहून अधिक 
 • उस्मानाबाद - अर्जुन सलगर - 95 हजारांहून अधिक 
 • परभणी - मोहम्मद खान - 1 लाख 40 हजारांहून अधिक 
 • पुणे - अनिल जाधव - 50 हजारांहून अधिक 
 • रावेर - नितीन कंदिलकर - 80 हजारांहून अधिक 
 • सांगली - गोपीचंद पडळकर - 2 लाख 50 हजारांहून अधिक 
 • सातारा - सहदेव येवले - 40 हजारांहून अधिक 
 • शिर्डी - संजय सुखदान - 62 हजारांहून अधिक 
 • शिरुर - राहुल ओव्हाळ - 35 हजारांहून अधिक 
 • सोलापूर - प्रकाश आंबेडकर - 1 लाख 60 हजारांहून अधिक 
 • ठाणे - मल्लिकार्जुन पुजारी - 40 हजारांहून अधिक 
 • यवतमाळ - प्रविण पवार - 80 हजारांहून अधिक 

Web Title: Maharashtra Lok Sabha election results 2019: Congress-NCP's dream is broken due to the Vanchit Bahujan Aaghadi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.