Maharashtra Lockdown : "लॉकडाऊनऐवजी कोरोनावर प्रभावी उपाय करा", चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 04:02 PM2021-04-12T16:02:36+5:302021-04-12T16:06:21+5:30

BJP Chandrakant Patil And Uddhav Thackeray Maharashtra Lockdown : लॉकडाऊनमुळे त्याचे प्रमाण कमी होईल. पण तो समूळ नष्ट होणार नाही. त्यामुळे तात्पुरता लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लागू करण्यासह प्रदीर्घकालीन उपाययोजनांवर भर देण्याची गरज आहे.

Maharashtra Lockdown Take effective measures on corona instead of lockdown says BJP Chandrakant Patil | Maharashtra Lockdown : "लॉकडाऊनऐवजी कोरोनावर प्रभावी उपाय करा", चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Maharashtra Lockdown : "लॉकडाऊनऐवजी कोरोनावर प्रभावी उपाय करा", चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर लॉकडाऊन हा एकच पर्याय नाही. त्यापेक्षा आरोग्य यंत्रणेसाठी पायाभूत सुविधा वाढविणे आणि प्रभावी उपाययोजानांवर अधिकाधिक भर द्या, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्हिडीओ क्लिपद्वारे केली आहे. तसेच, यामध्ये स्वयंसेवी संस्थांची देखील मदत घ्यावी, अशी सूचना पाटील यांनी केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच जण चिंतेत आहेत. केवळ आठ दिवस किंवा पंधरा दिवसाच्या लॉकडाऊनमुळे तो संपणार नाही आहे. लॉकडाऊनमुळे त्याचे प्रमाण कमी होईल. पण तो समूळ नष्ट होणार नाही. त्यामुळे तात्पुरता लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लागू करण्यासह प्रदीर्घकालीन उपाययोजनांवर भर देण्याची गरज आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणांसाठी पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात पुरविल्या पाहिजेत असं पाटील यांनी म्हटलं आहे. 

"कोरोना चाचण्यांसंदर्भात लोक साशंक आहेत त्यामुळे बिनचूक टेस्टिंग किटसाठी पाठपुरावा केला पाहिजे. टाटाने अशा प्रकारचे टेस्टिंग किट उपलब्ध करुन दिले होते, मात्र ती कुठे गायब झाली, याचा पाठपुरावा केला पाहिजे. त्याचप्रमाणे ज्यांना सौम्य लक्षणे आहेत, त्यांच्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कोविड सेंटर सुरु करणे, ज्यांना तीव्र स्वरुपाची लक्षणे आहेत, त्यासाठी ऑक्सिजन बेड वाढवणे, तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून सर्व रुग्णालयांना पुरवणे, त्याचप्रमाणे रुग्णालयांमध्येच ऑक्सिजन तयार होईल, अशी यंत्रणा कार्यन्वित करणे, याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील व्हेंटिलेटरचा आढावा घेणे, तसेच मनुष्यबळाची कमतरता भरुन काढण्यासाठी मेडिकलच्या शेवटच्या वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना कोविडच्या कामात सहभागी करुन घेणे, आदी उपाययोजना करण्याची गरज आहे" असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. 

चंद्रकांत पाटील यांनी कोरोनामुळे लॉकडाऊनवर भर देण्याऐवजी अर्ली डिटेक्शन, बिनचूक टेस्टिंग किट उपलब्ध करुन देणे, अद्यायवत सुविधांनी युक्त कोविड रुग्णालये, रेमडेसिवीरची उपलब्धता आदींसाठी आमदारांना वाढीव दोन कोटी रुपये विकासनिधी दिला आहे, तो सर्व जिल्हानियोजनमध्ये जमा करावा असं म्हटलं आहे. कारण, एका जिल्ह्यात साधारणत: दहा आमदार प्रमाणे २० कोटी रुपये निधी उपलब्ध असतो, त्यासोबतच शासनाने अतिरिक्त २० कोटी प्रत्येक जिल्ह्यांना असे एकूण ४० कोटी रुपये मिळाल्यास त्याद्वारे प्रभावी उपाययोजनासह पायाभूत सुविधा वाढविणे शक्य आहे. त्यामुळे लोकांना घरात बंद करुन, काही साध्य होणार नाही. त्याऐवजी प्रदीर्घ कालीन विचार करुन पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केलं आहे. 

"माजी आमदार पास्कल धनारे यांच्या निधनाने आदिवासींचा सेवक गमावला"

भारतीय जनता पार्टीचे पालघरचे माजी जिल्हाध्यक्ष आणि डहाणूचे माजी आमदार पास्कल धनारे यांच्या निधनाने पक्षाने आदिवासी समाजाचा सेवक गमावला आहे, अशी श्रद्धांजली चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी अर्पण केली. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, पास्कल धनारे यांच्या अकस्मिक निधनाने धक्का बसला. त्यांनी दीर्घकाळ पक्ष संघटनेत कार्य केले होते. पालघरचे भाजपा जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षाच्या विस्तारात योगदान दिले होते. तत्पूर्वी जिल्हा सरचिटणीस तसेच तालुका पातळीवरील पदांवर काम करताना त्यांनी पक्षाचा जनाधार बळकट करण्यासाठी कार्य केले होते. डहाणू या कम्युनिस्टांच्या एकेकाळच्या बालेकिल्ल्यात त्यांनी भारतीय जनता पार्टीतर्फे विजय मिळविला होता. आदिवासींच्या प्रश्नांबाबत त्यांना तळमळ होती. आपण त्यांना भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रतर्फे श्रद्धांजली अर्पण करतो.

Read in English

Web Title: Maharashtra Lockdown Take effective measures on corona instead of lockdown says BJP Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.