स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी: भाजप, काँग्रेसकडून बी फॉर्मचे वाटप; तीन-चार दिवसांत उमेदवारही ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 08:15 IST2025-11-13T08:15:32+5:302025-11-13T08:15:58+5:30
Maharashtra Local Body Election: नगरसेवक आणि थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठीचे बी फॉर्म वाटप भाजप आणि काँग्रेसने केले आहे. येत्या तीन ते चार दिवसात उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे. उमेदवारांची यादी अंतिम करण्याच्या कामाला दोन्ही पक्षांनी वेग दिला असून, त्यासाठी मुंबईत आज दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी: भाजप, काँग्रेसकडून बी फॉर्मचे वाटप; तीन-चार दिवसांत उमेदवारही ठरणार
मुंबई - नगरसेवक आणि थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठीचे बी फॉर्म वाटप भाजप आणि काँग्रेसने केले आहे. येत्या तीन ते चार दिवसात उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे. उमेदवारांची यादी अंतिम करण्याच्या कामाला दोन्ही पक्षांनी वेग दिला असून, त्यासाठी मुंबईत आज दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते. भाजप आणि काँग्रेसनेही प्रत्येक जिल्ह्यात एक पक्षप्रभारी नियुक्त केले आहेत. त्यांच्याकडे उमेदवारी अर्जासोबत सादर करण्यासाठीचे बी फॉर्म देण्यात आले आहेत. भाजपने
मनसे-काँग्रेस युतीचे काय?
मनसेसंदर्भात आघाडीचा प्रस्ताव आलेला नाही. मुंबई पालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतरच इथे आघाडी करायची की स्वबळावर लढायचे यावर निर्णय घेतला जाणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकारांना सांगितले. भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्य निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी रात्री उशिरापर्यंत वर्षा निवासस्थानी चर्चा करून बहुतांशी नावे निश्चित केली.
उमेदवारांची नावे कधी जाहीर केली जाणार?
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबर आहे. त्यामुळे मोठे राजकीय पक्ष आदल्या दिवशी म्हणजे १६ नोव्हेंबरला उमेदवार जाहीर करतील असे म्हटले जात होते.
मात्र ऑनलाइन अर्ज भरणे क्लिष्ट आहे तसेच शेवटच्या दिवशी इंटरनेट सेवा उपलब्ध झाली नाही तर गडबड होऊ शकते म्हणून किमान दोन दिवस आधी उमेदवारांची नावे जाहीर केली जातील, अशी शक्यता अधिक आहे. राजकीय पक्षाने ज्या उमेदवाराला बी फॉर्म दिला आहे तोच अधिकृत उमेदवार मानला जातो. त्यामुळे ज्यांना बी फॉर्म मिळाला असेल, त्यांची नावे निश्चित झाली आहेत.