शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची नियमावली जारी, चर्चमध्ये विशेष प्रार्थनेसाठी केवळ 50 जणांनाच परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 13:23 IST

यासंदर्भात, सर्व ख्रिस्ती बांधवांनी यावर्षी ख्रिसमसचा उत्सव अगदी साधेपणाने साजरा करावा, असे आवाहनही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी केले.

ठळक मुद्देकोरोना व्हायरसचा नवा धोका लक्षात घेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारे सातत्याने सुरक्षिततेसंदर्भात पावले उचलताना दिसत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 2020 वर्षातील जवळपास सर्वच सण उत्सव अगदी साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही शहरांमध्ये नाईट कर्फ्यूदेखील लागू करण्यात आला आहे.

मुंबई - कोरोना व्हायरसचा नवा धोका लक्षात घेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारे सातत्याने सुरक्षिततेसंदर्भात पावले उचलताना दिसत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 2020 वर्षातील जवळपास सर्वच सण उत्सव अगदी साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे आता ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवरही गृह मंत्री अनिल देशमुख यांनी काही निर्देश जारी केले आहेत. यानुसार ख्रिसमसनिमित्त कुठल्याही चर्चमध्ये 50 हून अधिक लोकांना एकत्रित येण्याची परवानगी नसेल.

यासंदर्भात, सर्व ख्रिस्ती बांधवांनी यावर्षी ख्रिसमसचा उत्सव अगदी साधेपणाने साजरा करावा, असे आवाहनही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही शहरांमध्ये नाईट कर्फ्यूदेखील लागू करण्यात आला आहे. 5 जानेवारीपर्यंत हा नाईट कर्फ्यू लागू राहणार आहे.

चर्च प्रशासनाला करावे लागेल सोशल डिस्टन्सिंगचे पालन -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृहमंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशानुसार, चर्च प्रशासनाला सोशल डिस्टन्सिंग आणि चर्चमध्ये गर्दी होणार नाही याकडे लक्ष द्यावे लागेल. यावर्षी स्थानिक चर्चमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या सार्वजनिक प्रार्थनेसाठी केवळ 50 जणांनाच एकत्रित येण्याची परवानगी देण्यात आली आहे. याच बरोबर चर्च प्रशासनाला परिसराचे नियमितपणे सॅनिटायझेशनदेखील करावे लागेल. याशिवाय चर्चमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला मास्कचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. 

60 वर्षांवरील नागरिक अन् 10 वर्षांखाली मुलांनी घराबाहेर पडणे टाळावे -ग्रुहमंत्रलयाने जारी केलेल्या निर्देशांत, 60 वर्षांवरील नागरिक आणि 10 वर्षांखाली मुलांनी चर्चमध्ये जाणे अथवा घराबाहेर पडणे टाळावे. यावेळी त्यांनी घरातच सण साजरा करावा. याच बरोबर, गर्दी होईल, असे देखावे अथवा आतिषबाजी करू नये. तसेच 31 डिसेंबरला आभारप्रदर्शनासाठीचे मास आयोजित करताना वेळेचे निर्बंध पाळवेत आणि मध्यरात्रीऐवजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारासच याचे आयोजन करावे, असे म्हणण्यात आले आहे. याशिवाय चर्चमध्ये प्रभू येशूचे स्तुतीगीत गाण्यासाठी 10हून अधिक व्यक्तींचा सहभाग नसावा. तसेच यावेळी माईक स्वच्छ असण्यासंदर्भातही काळजी घ्यावी, असेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे. 

टॅग्स :ChristmasनाताळState Governmentराज्य सरकारAnil Deshmukhअनिल देशमुखcorona virusकोरोना वायरस बातम्या