शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

​​​​​​​Heatwave Alert: महाराष्ट्र होरपळणार! मुंबई-ठाण्यासह कोकणात 'तीव्र उष्णतेची लाट'; विदर्भातही पारा चढणार, तर 'या' जिल्ह्यांत पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 13:24 IST

Maharashtra Heat Wave Alert: भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) ९ मार्च २०२६ रोजी जारी केलेल्या अधिकृत अहवालानुसार, महाराष्ट्रातील विविध भागांत हवामानाचे दोन टोकाचे पैलू पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला कोकण आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) हाहाकार माजणार आहे, तर दुसरीकडे दक्षिण महाराष्ट्रात पावसाची हजेरी लागणार आहे.

मुंबई: राज्यात उन्हाचा कडाका आता असह्य होऊ लागला आहे. हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांसाठी 'तीव्र उष्णतेच्या लाटेचा' इशारा जारी केला असून ९ आणि १० मार्च हे दोन दिवस अत्यंत कठीण राहण्याची शक्यता आहे. एकीकडे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दमट हवामानामुळे नागरिक हैराण होणार असतानाच, सिंधुदूर्ग, कोल्हापूर-सांगली भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये ९ मार्च रोजी 'उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट' येण्याची ५१ ते ७५% शक्यता आहे. १० मार्च रोजी देखील या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोकण विभाग: तीव्र उष्णतेचा इशारा 

पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड: या जिल्ह्यांत ९ मार्च रोजी 'तीव्र उष्णतेची लाट' येण्याची शक्यता आहे. १० मार्च रोजी देखील येथे उष्णतेची लाट कायम राहील.रत्नागिरी: येथे ९ आणि १० मार्च रोजी हवामान अत्यंत उष्ण आणि दमट असेल. सिंधुदुर्ग: ९ मार्च रोजी येथे हलक्या पावसाची शक्यता असून त्यानंतर हवामान कोरडे राहील.

उत्तर महाराष्ट्र: उष्ण आणि दमट हवामान

धुळे आणि नंदुरबार: ९ मार्च रोजी येथे उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.जळगाव: ९ आणि १० मार्च अशा दोन्ही दिवशी येथे उष्ण आणि दमट हवामान असेल.नाशिक: ९ मार्च रोजी उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे.

विदर्भ: उष्णतेची लाट 

अकोला: ९, १० आणि ११ मार्च असे सलग तीन दिवस येथे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.अमरावती: ९ आणि १० मार्च रोजी येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.वर्धा: १० आणि ११ मार्च रोजी या जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर: या जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काय इशारा...

छत्रपती संभाजीनगर, जालना: येथे ९ आणि १० मार्च रोजी हवामान उष्ण आणि दमट राहील.परभणी, बीड, हिंगोली: १० आणि ११ मार्च रोजी या भागात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा आहे.अहिल्यानगर (अहमदनगर): १० मार्च रोजी येथे उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.लातूर: ११ मार्च रोजी येथे हवामान उष्ण आणि दमट राहील.

पुणे, धाराशिव, नांदेड: या जिल्ह्यांत पुढील ५ दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे असेल, कोणताही विशेष इशारा नाही.

पाऊस आणि गडगडाट 

कोल्हापूर, सातारा आणि सांगली: या जिल्ह्यांत ९ मार्च रोजी हलक्या पावसाची किंवा गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातRainपाऊसSummer Specialसमर स्पेशलweatherहवामान अंदाजMaharashtraमहाराष्ट्र