शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र, हरियाणा विजयी

By admin | Updated: December 30, 2014 23:32 IST

अपंगांची राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा : मालवण बोर्डींग मैदानावर आयोजन

मालवण : मालवण येथील लक्ष्मीबाई नारायण साटम स्पोर्टस् अ‍ॅण्ड एज्युकेशन ट्रस्टच्यावतीने धुरीवाडा येथील बोर्डींग मैदानावर आयोजित अपंग क्रिकेटपटूंच्या राष्ट्रीय ट्वेंटी-२0 लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी पहिल्या दिवशी महाराष्ट्र संघाने उत्तरप्रदेशच्या संघाचा ३३ धावांनी दणदणीत पराभव केला. दुसऱ्या सामन्यात हरियाणा संघाने कर्नाटक संघाला ४७ धावांत गुंडाळत कर्नाटकचा दारूण पराभव केला. यावेळी अपंग क्रिकेटपटूंनी खेळात दाखविलेल्या जिद्दीचे मालवणवासीयांनी कौतुक केले.मालवण येथील बोर्डींग मैदानावरील सौ. लक्ष्मीबाई नारायण साटम पॅव्हेलियन- स्टेडीयमच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन दादा महाराज घोसाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी दिगंबर सामंत, अशोक वाडेकर, शशिकांत विश्वासराव, दिलीपराव कल्याणकर, जयंत गवंडे, सुनील कुलकर्णी, अरूण शेवाळे, नारायण गावडे उपस्थित होते.मंगळवारी पहिल्या सामन्यात महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ गडी गमावून १६० धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना उत्तरप्रदेशचा संघ १२७ धावांत गारद झाल्याने महाराष्ट्र संघाने ३३ धावांनी विजय मिळविला. दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या कर्नाटक संघाला हरियाणा संघाने अवघ्या ४७ धावात गारद केले. हा सामना १५-१५ षटकांचा खेळविण्यात आला. हरियाणा संघाने ५० धावा करीत सहज विजय मिळविला. बुधवारी महाराष्ट्र विरूद्ध कर्नाटक व उत्तरप्रदेश विरूद्ध हरियाणा असे सामने होणार आहेत.अजित वाडेकर उपस्थित राहणारस्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा, उत्तरप्रदेश या राज्यांचे अपंग क्रिकेटपटूंचे संघ सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा १ जानेवारीपर्यंत चालणार असून ३१ डिसेंबर रोजी भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर हे उपस्थित राहणार आहेत.