शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: सत्तासंघर्ष शिगेला; राज्यात नेमकं काय घडणार? जाणून घ्या शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 09:35 IST

राज्यात राजकीय हालचालींना वेग

मुंबई: राज्यात सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. मुख्यमंत्रिपदाची मागणी पूर्ण न झाल्यानं शिवसेनेनं भाजपापासून फारकत घेत थेट काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली. या तीन बैठकांमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालं. त्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं. मात्र शनिवारी सकाळी अचानक अजित पवार यांनी भाजपासोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे मोठा राजकीय भूकंप झाला. यानंतर राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाला ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली. त्यामुळे येत्या काळात राज्यात अतिशय रंजक घडामोडी पाहायला होऊ शकतात. राज्यात नेमकं काय होऊ शकतं, जाणून घ्या शक्यता१) अजित पवार यांचे बंड यशस्वी झालं, तरी संख्या पुरेशी होण्यासाठी आणखी तडजोडी लागणार. २) अजित पवारांचे बंड यशस्वी होण्याची शक्यता अतिशय कमी आहे. कारण दोन तृतीयांश आमदार अजित पवारांसोबत जाण्याची शक्यता धूसर झाली आहे. अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित असलेले १३ पैकी १२ आमदार परतले आहेत.३) फडणवीस हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याप्रमाणे राजीनामा देतील. मात्र राजीनामा देताना विधानसभा बरखास्तीची शिफारस करतील किंवा फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर राज्यपाल अशी शिफारस राष्ट्रपतींकडे करतील.४) पुन्हा राष्ट्रपती राजवट आणि ती वर्षभर चालेल. यानंतर निवडणूक होईल.५) वर्षभराच्या कालावधीत अजित पवार आणि धनंजय मुंडे यांना राजकीय बळ देण्याचा भाजपाचा प्रयत्न राहील. अजित पवारांना राज्यसभेवर घेतलं जाऊ शकतं. हे दोन नेते भाजपच्या गळाला लागल्यास मराठा व ओबीसींमध्ये भाजपाचा शिरकाव होईल. राष्ट्रवादीची राजकीय स्पेस काँग्रेसकडे जाऊ न देण्याची खटपट भाजपा करेल.६) शरद पवार मवाळ होणार नसतील तर शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी निवडणूक हाच पर्याय भाजपासमोर आहे.७) अजित पवार व धनंजय मुंडे एकतर सत्तेत किंवा सत्तेबाहेर राहून भाजपाबरोबर राहिले तर पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात भाजपाला ताकद मिळेल. आज याच भागात भाजपा कमजोर आहे. इतरत्र भाजपाची कामगिरी चांगली झाली आहे.८) महाराष्ट्रात विरोधकांचं सरकार आल्यास शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना ताकद मिळेल. असं झाल्यास पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहांसाठी ती मोठी नामुष्की असेल. त्यामुळे असं होऊ यासाठी दोन्ही नेते संपूर्ण ताकद पणाला लावतील. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाDhananjay Mundeधनंजय मुंडेAjit Pawarअजित पवार