शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

Maharashtra Government: आमचं कुटुंब एक आहे आणि शेवटपर्यंत एकच राहील- रोहित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 9:36 AM

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या.

मुंबईः राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सोबत घेऊन शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज (26 नोव्हेंबर) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अजित पवार पुन्हा राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबामध्ये परतले. या सर्वच प्रकारावर राष्ट्रवादी आमदार आणि अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, सुरुवातीला जेव्हा अजितदादांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली ते टीव्हीवर बघितलं तेव्हा विश्वास बसत नव्हता की, हे कसं झालं. शेवटी त्या खोलात माझ्यासारखा कार्यकर्ता गेला नाही. कुटुंब म्हणून थोडासा संभ्रम होता. काय होणार हे कळत नव्हतं. पण त्यातच कुठेतरी हा विश्वास होता की दादा पुन्हा परततील. आम्ही दादांना मनापासून ओळखतो. एवढ्या वादाच्या काळातही दादांनी अनेक लोकांचे आणि कुटुंबीयांचे फोन घेतले होते. कुटुंबाला दुर्लक्षित करून चालत नाही हे आमच्या कुटुंबाला माहीत आहे. आमचं कुटुंब एक आहे आणि शेवटपर्यंत एकच राहील. कालचा दिवसच गोड होता. दादा परत एकदा साहेबांना भेटले ही गोड बातमी आहे, असं म्हणत रोहित पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.ते म्हणाले, मी सातत्यानं सांगतोय पवारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो, दादांची काम करण्याची जी पद्धत आणि क्षमता आघाडीसाठी अतिशय महत्त्वाची आहे. दादा आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी परत येतील, अशी अपेक्षा त्यावेळी आम्ही केली होती. काल दादा साहेबांना भेटले ते पाहून कुटुंबातील व्यक्ती म्हणून आनंद झालाच. पण एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून जास्त आनंद झाला. अजित पवार भाजपाबरोबर गेल्यानंतर पवार साहेब अस्वस्थ होते. पवार साहेब अस्वस्थ असले तरी ते अस्वस्थ आहेत, असं दाखवत नाहीत.रोहित पवार यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाची स्टाईल ही तोडाफोडीची आहे, भाजपानं ती स्टाइल लागू करण्याचा प्रयत्न केला. दादांनाही ती स्टाइल योग्य वाटत नसल्यानंच दादा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत परतले, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस