शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

Maharashtra Government: अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदावर गोपीचंद पडळकर म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 3:44 PM

बारामतीत अजित पवारांनी पडळकरांचा मोठा पराभव केला होता

मुंबई: महाविकासआघाडीसाठी बैठकांचं सत्र सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपाला पाठिंबा दिला. त्यांना भाजपाकडून उपमुख्यमंत्रिपद देण्यात आलं. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याचं समजताच सुखद धक्का बसल्याचं भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांनी बारामतीमधून अजित पवारांविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचं डिपॉजिट जप्त झालं. अजितदादांच्या शपथविधीची बातमी समजताच मला सुखद धक्का बसला. अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा आहे, असं मत गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्ष उत्तम काम केलं आहे. तर अजित पवार यांच्याकडे विधिमंडळातील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे. मंत्रिपदांचा मोठा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. त्यामुळे फडणवीस आणि पवार यांचं एकत्र येणं राज्याच्या दृष्टीनं चांगलं असल्याचं पडळकर म्हणाले. काल सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी झाला, त्यावेळी मी प्रवासात होतो. भाजपा नेते मिलिंद कोरेंचा मला फोन आला. त्यांनी मला शपथविधी संपन्न झाल्याची माहिती दिली. मात्र अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद दिल्यानं मला धक्का बसला नाही. अजित पवार भाजपासोबत आल्यानं राज्यात स्थिर सरकार येणार आहे. अजित पवारांनी दूरदृष्टीनं हा निर्णय घेतला असेल, असंदेखील पडळकर यांनी म्हटलं. अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद देणं हा त्यांना भरभरुन मतदान करणाऱ्या जनमताचा सन्मान आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद दिल्यानं सध्या लोकांच्या भावना स्फोटक आहेत. मात्र हा स्फोटकपणा हळूहळू कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भविष्यात पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारू. पक्षानं बारामतीत जाऊन काम करायचा आदेश दिल्यास तिथेही जाऊन काम करू, असंदेखील ते म्हणाले.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ajit Pawarअजित पवारGopichand Padalkarगोपीचंद पडळकरBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेस