Maharashtra Government Formation Live: Congress Working Committee meeting in Delhi, discussion on Mahasiv front | Maharashtra Government Formation Live: देशभरातील भाजपाच्या विभिन्न युतींची माहिती मागवली आहे; उद्धव ठाकरेंचा इशारा
Maharashtra Government Formation Live: देशभरातील भाजपाच्या विभिन्न युतींची माहिती मागवली आहे; उद्धव ठाकरेंचा इशारा

दिल्लीत सकाळी 10 वाजता काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक होणार आहे. त्यानंतरच, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर काँग्रेसकडून निर्णय घेण्यात येईल. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. सत्ता स्थापनेस शिवसेना फोल ठरल्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसलासत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलंय. 

राज्यातील सत्तापेचावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मंगळवारी मुंबईत दाखल होत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी ते चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहेत. शिवसेना आणि आघाडीत सत्ता वाटपाचे सुत्र ठरल्यानंतरच शिवसेनेला पाठिंबा देण्यावर निर्णय होणार असल्याचे समजते. 

 

08:49 PM

सत्तास्थापनेसाठी जे जे करावं लागेल, ते करेन; नारायण राणे उतरले मैदानात

महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्तास्थापनेसाठी जे जे करावं लागेल, ते करेन; नारायण राणे उतरले मैदानात

08:08 PM

राज्यपालांनी भाजपाच्या पत्रातच शिवसेनेला मुदत दिली; उद्धव ठाकरेंची टीका

08:05 PM

देशभरातील भाजपाच्या विभिन्न युतींची माहिती मागवली आहे; उद्धव ठाकरेंचा इशारा

देशभरातील भाजपाच्या विभिन्न युतींची माहिती मागवली आहे; उद्धव ठाकरेंचा इशारा

07:40 PM

शिवसेनेने कालच आघाडीकडे अधिकृतरित्या पाठिंबा मागितला

शिवसेनेने कालच आघाडीकडे अधिकृतरित्या पाठिंबा मागितला. आम्ही त्यावर चर्चा केली आहे. यावर सविस्तर चर्चा करून पुढील रणनिती ठरविणार असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. 

07:17 PM

राष्ट्रपती राजवट म्हणजे महाराष्ट्राचा घोर अपमान; राज ठाकरेंची टीका

राष्ट्रपती राजवट म्हणजे महाराष्ट्राचा घोर अपमान; राज ठाकरेंची टीका

06:52 PM

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरू; थोड्याच वेळात पत्रकार परिषद

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरू; थोड्याच वेळात पत्रकार परिषद

06:51 PM

उद्धव ठाकरे शिवसेना आमदारांच्या भेटीला; एकनाथ शिंदेही दाखल

उद्धव ठाकरे शिवसेना आमदारांच्या भेटीला; एकनाथ शिंदेही दाखल

06:29 PM

राष्ट्रपती राजवटीविरोधातही याचिका दाखल करण्याचा शिवसेनेचा विचार

राष्ट्रपती राजवटीविरोधातही याचिका दाखल करण्याचा शिवसेनेचा विचार

05:45 PM

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू; रामनाथ कोविंद यांनी केली स्वाक्षरी

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू; रामनाथ कोविंद यांनी केली स्वाक्षरी

04:36 PM

गृहमंत्रालयाची सायंकाळी 5.30 वाजता पत्रकार परिषद

गृहमंत्रालयाची सायंकाळी 5.30 वाजता पत्रकार परिषद. राष्ट्रपती राजवटीची घोषणा होण्याची शक्यता

04:15 PM

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वकील कपिल सिब्बल शिवसेनेची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडणार

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वकील कपिल सिब्बल शिवसेनेची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडणार

03:30 PM

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस, राज्यपालांचे पत्र

02:40 PM

राष्ट्रपती राजवटीच्या वृत्ताचे खंडन, राजभवन प्रवक्त्यांनी फेटाळलं वृत्त

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता असून राज्यपालांनी पत्र पाठविल्याचं वृत्त प्रसारीत करण्यात आलं होतं. मात्र, राजभवनातील प्रवक्त्यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे, अशी कुठलिही शिफारस करण्यात आली नसल्याचे राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

02:31 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक सुरू

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ सदस्य आणि खासदार यांच्यासमवेत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे बैठक सुरु आहे.

02:02 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली कॅबिनेट मंत्रीमंडळाची तातडीची बैठक

01:40 PM

महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीच्या तयारीत, राज्यपालांचं दिल्लीला पत्र

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे याबाबत तयारी सुरू असल्याची सुत्रांची माहिती आहे. कारण, महाशिवआघाडीचा तिढा कायम असून शिवसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यास अनुकूल नसल्याचं समजते. त्यामुळेच, राष्ट्रपती राजवट लागण्याची दाट शक्यत असून राज्यपालांनी दिल्लील तसे पत्रही पाठविल्याची माहिती आहे. 

01:20 PM

दिल्लीतील काँग्रेस नेते शरद पवारांच्या भेटीसाठी मुंबईत

12:32 PM

भाजपा नेते आशिष शेलार यांनीही घेतली संजय राऊतांची भेट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनीही संजय राऊत यांनी लिलावती रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. 

12:26 PM

संजय राऊत यांना बुधवारी मिळणार डिस्चार्ज

11:16 AM

लवकरच सत्ता स्थापनेचा तिढा सुटेल, भुजबळ प्रचंड आशावादी

शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस लवकरच एकत्र येऊन सत्ता स्थापन करेल, असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलंय. लवकरच सत्ता स्थापनेचा तिढा सुटेल, असा विश्वासही भुजबळ यांनी बोलून दाखवला.  

10:29 AM

राष्ट्रपतींनी अरविंद सावंत यांचा राजीनामा स्वीकारला

शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्विकारला आहे. त्यानंतर, केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे या खात्याचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.

10:16 AM

... म्हणून काँग्रेसनं शिवसेनेला समर्थन पत्र दिलं नाही, पवारांचा 'तो' एक कॉल

10:00 AM

शरद पवार लिलावती रुग्णालयात संजय राऊतांची भेट घेणार

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार लिलावती रुग्णालयात जाऊन शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेणार आहे. आज राष्ट्रवादीकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येईल. 

09:25 AM

संजय राऊत यांची थेट रुग्णालयातून बॅटींग, सत्ता स्थापनेचा दावा

08:19 AM

राष्ट्रवादी काँग्रेसला 8.30 वाजेपर्यंत सत्ता स्थापनेसाठी वेळ

शिवसेनेनंतर राज्यपालांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. त्यानुसार, राष्ट्रवादीला रात्री 8.30 वाजेपर्यंत आमदारांच्या सह्यांच पत्र देण्याची मुदत आहे. स्पष्ट बहुमतासाठी राष्ट्रवादीला 145 आमदारांचं संख्याबळ हवं आहे. आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक झाल्यानंतर अंतिम निर्णय होईल. 

Read in English

English summary :
Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : Get latest news around controversies between Maharashtra's political parties like shiv sena , bjp and congress. Check who will form alliance. For more news in Marathi on Maharashtra's government formation or around Maharashtra's CM visit Lokmat.com.


Web Title: Maharashtra Government Formation Live: Congress Working Committee meeting in Delhi, discussion on Mahasiv front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.