Maharashtra Government Formation Live: देशभरातील भाजपाच्या विभिन्न युतींची माहिती मागवली आहे; उद्धव ठाकरेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 22:31 IST2019-11-12T07:46:37+5:302019-11-12T22:31:51+5:30
Maharashtra Election 2019 Live News: राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच कायम असून सरकार कोण स्थापन करणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Government Formation Live: देशभरातील भाजपाच्या विभिन्न युतींची माहिती मागवली आहे; उद्धव ठाकरेंचा इशारा
दिल्लीत सकाळी 10 वाजता काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक होणार आहे. त्यानंतरच, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर काँग्रेसकडून निर्णय घेण्यात येईल. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. सत्ता स्थापनेस शिवसेना फोल ठरल्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसलासत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलंय.
राज्यातील सत्तापेचावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मंगळवारी मुंबईत दाखल होत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी ते चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहेत. शिवसेना आणि आघाडीत सत्ता वाटपाचे सुत्र ठरल्यानंतरच शिवसेनेला पाठिंबा देण्यावर निर्णय होणार असल्याचे समजते.
08:49 PM
सत्तास्थापनेसाठी जे जे करावं लागेल, ते करेन; नारायण राणे उतरले मैदानात
महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्तास्थापनेसाठी जे जे करावं लागेल, ते करेन; नारायण राणे उतरले मैदानात
08:08 PM
राज्यपालांनी भाजपाच्या पत्रातच शिवसेनेला मुदत दिली; उद्धव ठाकरेंची टीका
Uddhav Thackeray, Shiv Sena chief: BJP was invited by the Governor but they refused to form govt in the state. The next day we were given the invitation (by Governor), we were given only 24 hours time but we required 48 hours. But he (Maharashtra) didn't give us 48 hours time. pic.twitter.com/0dbinykFWE
— ANI (@ANI) November 12, 2019
08:05 PM
देशभरातील भाजपाच्या विभिन्न युतींची माहिती मागवली आहे; उद्धव ठाकरेंचा इशारा
देशभरातील भाजपाच्या विभिन्न युतींची माहिती मागवली आहे; उद्धव ठाकरेंचा इशारा
07:40 PM
शिवसेनेने कालच आघाडीकडे अधिकृतरित्या पाठिंबा मागितला
शिवसेनेने कालच आघाडीकडे अधिकृतरित्या पाठिंबा मागितला. आम्ही त्यावर चर्चा केली आहे. यावर सविस्तर चर्चा करून पुढील रणनिती ठरविणार असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
07:17 PM
राष्ट्रपती राजवट म्हणजे महाराष्ट्राचा घोर अपमान; राज ठाकरेंची टीका
राष्ट्रपती राजवट म्हणजे महाराष्ट्राचा घोर अपमान; राज ठाकरेंची टीका
06:52 PM
राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरू; थोड्याच वेळात पत्रकार परिषद
राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरू; थोड्याच वेळात पत्रकार परिषद
06:51 PM
उद्धव ठाकरे शिवसेना आमदारांच्या भेटीला; एकनाथ शिंदेही दाखल
उद्धव ठाकरे शिवसेना आमदारांच्या भेटीला; एकनाथ शिंदेही दाखल
06:29 PM
राष्ट्रपती राजवटीविरोधातही याचिका दाखल करण्याचा शिवसेनेचा विचार
राष्ट्रपती राजवटीविरोधातही याचिका दाखल करण्याचा शिवसेनेचा विचार
Rajesh Inamdar, Shiv Sena's lawyer: About the President's Rule, whatever information I'm getting it's through the news channels. Let's have a legal discussion on this&accordingly if there is a necessity of filing a petition we will take a legal recourse as per law. #Maharashtrapic.twitter.com/SmM08qUECj
— ANI (@ANI) November 12, 2019
05:45 PM
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू; रामनाथ कोविंद यांनी केली स्वाक्षरी
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू; रामनाथ कोविंद यांनी केली स्वाक्षरी
President's Rule imposed in the state of #Maharashtra, after the approval of President Ram Nath Kovind. pic.twitter.com/tR3qW4xYbR
— ANI (@ANI) November 12, 2019
04:36 PM
गृहमंत्रालयाची सायंकाळी 5.30 वाजता पत्रकार परिषद
गृहमंत्रालयाची सायंकाळी 5.30 वाजता पत्रकार परिषद. राष्ट्रपती राजवटीची घोषणा होण्याची शक्यता
04:15 PM
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वकील कपिल सिब्बल शिवसेनेची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडणार
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वकील कपिल सिब्बल शिवसेनेची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडणार
03:30 PM
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस, राज्यपालांचे पत्र
Raj Bhavan Press Release 12.11.2019 3.16 PM pic.twitter.com/qmlQA6ghBR
— Governor of Maharashtra (@maha_governor) November 12, 2019
02:40 PM
राष्ट्रपती राजवटीच्या वृत्ताचे खंडन, राजभवन प्रवक्त्यांनी फेटाळलं वृत्त
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता असून राज्यपालांनी पत्र पाठविल्याचं वृत्त प्रसारीत करण्यात आलं होतं. मात्र, राजभवनातील प्रवक्त्यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे, अशी कुठलिही शिफारस करण्यात आली नसल्याचे राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
02:31 PM
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक सुरू
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ सदस्य आणि खासदार यांच्यासमवेत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे बैठक सुरु आहे.
02:02 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली कॅबिनेट मंत्रीमंडळाची तातडीची बैठक
Prime Minister Narendra Modi calls a cabinet meeting just before his departure this afternoon for BRICS summit in Brazil. pic.twitter.com/9SnRzEioVD
— ANI (@ANI) November 12, 2019
01:40 PM
महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीच्या तयारीत, राज्यपालांचं दिल्लीला पत्र
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे याबाबत तयारी सुरू असल्याची सुत्रांची माहिती आहे. कारण, महाशिवआघाडीचा तिढा कायम असून शिवसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यास अनुकूल नसल्याचं समजते. त्यामुळेच, राष्ट्रपती राजवट लागण्याची दाट शक्यत असून राज्यपालांनी दिल्लील तसे पत्रही पाठविल्याची माहिती आहे.
01:20 PM
दिल्लीतील काँग्रेस नेते शरद पवारांच्या भेटीसाठी मुंबईत
सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता; काँग्रेसचे 'चाणक्य' पवारांच्या भेटीला @INCMaharashtra@NCPspeaks#MaharashtraPoliticshttps://t.co/k5JOpMJSNr
— Lokmat (@MiLOKMAT) November 12, 2019
12:32 PM
भाजपा नेते आशिष शेलार यांनीही घेतली संजय राऊतांची भेट
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनीही संजय राऊत यांनी लिलावती रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे.
12:26 PM
संजय राऊत यांना बुधवारी मिळणार डिस्चार्ज
संजय राऊतांना उद्या डिस्चार्ज मिळणार, अतिदक्षता विभागातून बाहेर https://t.co/P83ZaX5SRJ#SanjayRaut
— Lokmat (@MiLOKMAT) November 12, 2019
11:16 AM
लवकरच सत्ता स्थापनेचा तिढा सुटेल, भुजबळ प्रचंड आशावादी
शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस लवकरच एकत्र येऊन सत्ता स्थापन करेल, असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलंय. लवकरच सत्ता स्थापनेचा तिढा सुटेल, असा विश्वासही भुजबळ यांनी बोलून दाखवला.
10:29 AM
राष्ट्रपतींनी अरविंद सावंत यांचा राजीनामा स्वीकारला
शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्विकारला आहे. त्यानंतर, केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे या खात्याचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.
President Ram Nath Kovind has accepted the resignation of Union Minister of Heavy Industries& Public Enterprises Arvind Sawant(Shiv Sena MP). I&B Minister Prakash Javadekar has been assigned additional charge of Sawant's ministry pic.twitter.com/mF65LbpY7p
— ANI (@ANI) November 12, 2019
10:16 AM
... म्हणून काँग्रेसनं शिवसेनेला समर्थन पत्र दिलं नाही, पवारांचा 'तो' एक कॉल
... म्हणून काँग्रेसनं शिवसेनेला समर्थन पत्र दिलं नाही, पवारांचा 'तो' एक कॉल https://t.co/nbhgnXaTEW
— Lokmat (@MiLOKMAT) November 12, 2019
10:00 AM
शरद पवार लिलावती रुग्णालयात संजय राऊतांची भेट घेणार
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार लिलावती रुग्णालयात जाऊन शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेणार आहे. आज राष्ट्रवादीकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येईल.
09:25 AM
संजय राऊत यांची थेट रुग्णालयातून बॅटींग, सत्ता स्थापनेचा दावा
"लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 12, 2019
कोशीश करने वालों की कभी हार नही होती ।'
बच्चन.
हम होंगे कामयाब..
जरूर होंगे...
08:19 AM
राष्ट्रवादी काँग्रेसला 8.30 वाजेपर्यंत सत्ता स्थापनेसाठी वेळ
शिवसेनेनंतर राज्यपालांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. त्यानुसार, राष्ट्रवादीला रात्री 8.30 वाजेपर्यंत आमदारांच्या सह्यांच पत्र देण्याची मुदत आहे. स्पष्ट बहुमतासाठी राष्ट्रवादीला 145 आमदारांचं संख्याबळ हवं आहे. आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक झाल्यानंतर अंतिम निर्णय होईल.