शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Flood: अस्मानी संकट थांबेना, आणखी १५ दिवस पावसाचे; शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 06:54 IST

उष्णतेतील वाढीला जमिनीतून मिळणारी आर्द्रता, त्यामुळे दुपारनंतर कम्युलस ढगांची निर्मिती होते.

पुणे/मुंबई : मराठवाडा, विदर्भात पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, गेले दोन-तीन दिवस ढगफुटीसारखा पाऊस पडत आहे. शनिवारी पहाटे औरंगाबादेत २५ मिनिटांत तब्बल ५१.२ मिमी एवढा पाऊस कोसळला. बीड, परभणी, श्रीगोंदा, चाळीसगाव येथेही मध्यरात्री पावसाने थैमान घातले.

उष्णतेतील वाढीला जमिनीतून मिळणारी आर्द्रता, त्यामुळे दुपारनंतर कम्युलस ढगांची निर्मिती होते. हे ढग उंचावर गेल्यावर त्यांना गारवा मिळून कमी वेळेत जोरदार पाऊस पडत असल्याचे ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले.वातावरण बदलामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या १५ दिवसांत असा पाऊस  पडतो. हा शेतीसाठी उपयोगी नसतो. डॉ. कुलकर्णी म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून परतीचा पाऊस लांबला आहे. आता ऑक्टोबरअखेर उजाडते.

काही वेळेस शहराच्या एका भागात जोरदार पाऊस तर इतर भागात पाऊस नसतो. मान्सूनची माघार लांबल्याने ऑक्टोबरचा पहिल्या १५ दिवसांत वादळी वाऱ्यासह जाेरदार पाऊस होत असतो. तसा तो सध्या होत आहे. अजून १५ दिवस असा पाऊस होऊ शकतो, असे डॉ. कुलकर्णी म्हणाले.

कम्युलस ढग कारणीभूतऑक्टोबरमध्ये सूर्याची किरणे सरळ रेषेत येत असतात. ज्याला आपण ऑक्टोबर हिट म्हणतो. आकाशातील ढगांचे आच्छादन कमी झालेले असते. त्यामुळे ही किरणे थेट जमिनीवर येतात. त्यात जमिनीमध्ये अजून भरपूर आर्द्रता असते. ऑक्टोबरमध्ये कमी जागेत उंच ढगांची निर्मिती होते. सूर्याच्या उष्णतेमुळे कम्युलस ढगांची निर्मिती होऊन दुपारनंतर असा जोरदार पाऊस पडतो, असे जीवनप्रकाश कुलकर्णी म्हणाले.

टॅग्स :floodपूरFarmerशेतकरी