शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 19:06 IST

एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीला 110-130 जागा मिळतील, असा अंदाज आहे.

Maharashtra Assembly Election Exit Poll 2024 Updates: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलचे अंदाज येण्यास सुरुवात झाली आहे. यानुसार, राज्यात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वातील महायुती सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 

महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकारमहाराष्ट्रात एनडीएला प्रचंड बहुमत मिळेल, असा अंदाज Matrize एक्झिट पोलने वर्तवला आहे. या एक्झिट पोलमध्ये महायुतीला 150-170 जागा मिळतील, तर काँग्रेस आघाडीला 110-130 जागा मिळतील असा अंदाज आहे. महाराष्ट्रात 288 जागा आहेत. 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.

PMARQ च्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रातही महायुतीचे सरकार येणार असल्याचे सांगितले जात आहे. PMARQ च्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला 137-157, महाविकास आघाडीला 126-146 आणि इतरांना 2-8 जागा मिळण्याची शक्यता आहे.

तर, चाणक्य स्ट्रॅटेजीजच्या एक्झिट पोलमध्येही महायुतीला बहुमत मिळणार असल्याचे सांगितले आहे. एक्झिट पोलनुसार, महायुतीला 152-160 जागा मिळतील, तर काँग्रेस आघाडीला 130-138 जागा मिळतील असा अंदाज आहे.

एक्झिट पोल कधी-कधी चुकीचे सिद्ध झाले?एक्झिट पोलचे निकाल कधी योग्य तर कधी चुकीचे ठरले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जवळपास सर्वच एक्झिट पोल चुकीचे सिद्ध झाले होते. सर्व एक्झिट पोलमध्ये भाजपला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. काही एक्झिट पोल तर एनडीएला 400 जागा मिळाल्याचे दाखवत होते. मात्र, निवडणुकीचे निकाल उलटे लागले. एनडीएला सरकार स्थापन करण्यात यश आले, मात्र त्यांना केवळ 292 जागा मिळाल्या. तर इंडिया अलायन्सने 232 जागा जिंकल्या.

त्याचप्रमाणे हरियाणातील जवळपास सर्वच एक्झिट पोल काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्याचा अंदाज वर्तवत होते. मात्र निकाल लागताच राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले. गेल्या वर्षी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील एक्झिट पोलही चुकीचे सिद्ध झाले होते. भाजपने तिन्ही राज्यात सत्ता मिळवली होती. 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीMahayutiमहायुतीBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना