शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

जागा वाटपावरून महायुतीत धुसफूस, नेत्यांच्या आदेशाचे उल्लंघन; नेमकं काय चाललंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 07:01 IST

जागावाटपाचे दावे-प्रतिदावे जाहीरपणे करणे योग्य नाही, तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसून ठरवतील, अशी प्रतिक्रिया यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली

मुंबई - विधानसभेच्या जागावाटपावरून महायुतीतील तीन प्रमुख नेते सोडून कोणीही बोलू नये, असे वारंवार सांगितले जात असतानाही तिन्ही पक्षांकडून या आदेशाचे उल्लंघन करणे सुरूच आहे. जागावाटपावरून दावे करणे महायुतीतील नेते थांबवत नसल्याचे चित्र शनिवारी पुन्हा समोर आले.

बुलढाण्याचे शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमचा पक्ष १२० जागा मागेल आणि शंभर निवडून आणेल, असे विधान केले. आमच्या पक्षाला इकडे-तिकडे पाहण्याची गरज नाही, आमचे नेते एकनाथ शिंदे पक्षाला मोठे यश मिळवून देतील, असे ते म्हणाले. त्यावर, गायकवाड यांचा विश्वास योग्यच आहे; पण जागावाटपाबाबत कोणीही बोलू नये, आम्हाला कोणालाही तो अधिकार नाही. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार काय तो फॉर्म्युला ठरवतील, अशी प्रतिक्रिया शिंदेसेनेचे आ. संजय शिरसाट यांनी दिली.  त्यावर, शिंदेसेनेचे काय ते तीनशेही जागा निवडून आणतील, पैशाच्या बळावर आम्ही काहीही करू शकतो, असे त्यांना वाटते, असा चिमटा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काढला.

शिंदेसेना आणि पवार गटाचे नेते आघाडीवर

दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आमच्या पक्षाला ८० ते ८५ जागा मिळायला हव्यात, असे विधान केले. काँग्रेस, अपक्षांसह ६० आमदार आजच आमच्याकडे आहेत, आणखी वीस-पंचवीस तरी जागा आम्हाला मिळायला हव्यात. भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी महायुतीतील मित्रपक्षांवर अन्याय होणार नाही, असा शब्द दिला आहे, असे भुजबळ म्हणाले.

जागावाटपाचे दावे-प्रतिदावे जाहीरपणे करणे योग्य नाही, तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसून ठरवतील, अशी प्रतिक्रिया यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. महायुतीमध्ये जिथे जो पक्ष निवडून येईल त्याला ती जागा द्यायची असे आमचे ठरले आहे. कोणताही वाद नाही, लवकरच फॉर्मुला ठरेल असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. 

टॅग्स :Mahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Shiv SenaशिवसेनाChhagan Bhujbalछगन भुजबळAjit Pawarअजित पवारBJPभाजपाRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील