Maharashtra Election 2019: 'मतदानावेळी कमळाचं बटण दाबलं की पाकिस्तानवर अणुबॉम्ब पडेल'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 22:25 IST2019-10-14T22:21:09+5:302019-10-14T22:25:24+5:30
विधानसभा निवडणुकीत भाजपाला मतदान करण्याचं आवाहन

Maharashtra Election 2019: 'मतदानावेळी कमळाचं बटण दाबलं की पाकिस्तानवर अणुबॉम्ब पडेल'
मीरारोड - विधानसभा निवडणुकीत कमळाच्या चिन्हावर बटन दाबलेत की अणुबॉम्ब आपोआपच पाकिस्तानवर पडेल असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या यांनी भाईंदरमधील प्रचारसभेत केले. भाईंदर पश्चिमेला असलेल्या शिवसेना गल्लीत रविवारी रात्री त्यांची जाहीर सभा भाजपाने आयोजित केली होती. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी उपस्थितांना भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले.
मौर्या म्हणाले की, भाजपाने कलम ३७० हटवल्या नंतर ही निवडणूक असल्याने महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीकडे जगाचे लक्ष लागलेले आहे. यावेळी भाजपाचे स्थानिक नगरसेवक अॅड. रवी व्यास, पंकज पांडे, मदन सिंग आदी उपस्थित होते. भर रस्त्यात सभा घेतल्याने वाहतूक बंद करण्यात येऊन नागरिकांना रहदारीला त्रास सहन करावा लागला.