शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
4
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
5
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
6
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
7
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
8
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
9
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
10
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
11
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
12
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
13
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
14
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
15
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
16
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
17
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
18
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
19
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
20
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण

महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेना खासदार संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 3:42 PM

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : पुढील दोन दिवस उपचारांसाठी रुग्णालयात राहणार

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून भाजपावर सतत टीकेचे बाण मारणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. छातीत दुखू लागल्यानं राऊत उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. दोन दिवस ते रुग्णालयात असतील. गेल्या काही दिवसापासून भाजपाला सतत अंगावर घेणारे राऊत रुग्णालयात दाखल झाल्यानं आता त्यांची जबाबदारी कोण सांभाळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत शिवसेनेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळत होते. कामाचा व्याप वाढल्यानं गेल्या काही दिवसांपासून त्यांना त्रास होत होता. मात्र त्याकडे त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केलं. अखेर आज कुटुंबीयांच्या आग्रहाखातर ते उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर डॉ. जलील पारकर यांची टीम उपचार करणार आहे. पुढचे दोन दिवस राऊत यांच्यावर उपचार होतील. संजय राऊत यांच्यावर अँजिओग्राफी होण्याची शक्यता आहे. याबद्दलचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होईल. गेल्या काही दिवसांपासून राऊत यांच्या वेळापत्रकात बदल झाला होता. याशिवाय त्यांच्यावरील कामाचा ताण वाढला होता. पुढील दोन दिवस राऊत यांच्यावर उपचार चालणार असल्यानं ते राजकीय घडामोडींपासून दूर राहतील. त्यांच्यावर सध्या असणारी जबाबदारी खासदार अनिल देसाई, अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात डॉक्टरांकडून पूर्ण तपासणी केली जाईल आणि त्यानंतर अँजिओग्राफीबद्दलचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती संजय राऊत यांचे बंधू आणि शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी दिली. संजय राऊत यांची प्रकृती गंभीर नाही. नियमित उपचारांचा भाग म्हणून ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. उद्यापर्यंत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल, असं सुनील राऊत यांनी सांगितलं. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाAnil Parabअनिल परबAnil Desaiअनिल देसाई