शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : कांद्याने केलाय शेतकऱ्यांचा वांदा

By अतुल कुलकर्णी | Updated: October 12, 2019 01:31 IST

आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला भेट दिली तेव्हा उमेदवार आणि मतदार दोघेही निवांत असल्याचे चित्र होते.

- अतुल कुलकर्णीनिवडणुकीच्या तोंडावर केलेली कांदा निर्यातबंदी हा शेतकऱ्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण करणारा प्रश्न आहे. गावोगावी फिरताना अनेक शेतकरी हा मुद्दा बोलून दाखवतात. लोक देशाविषयी किंवा राज्यातल्या प्रमुख प्रश्नाविषयी बोलतात असे दिसत नाही पण त्यांच्या रोजच्या जगण्याचे प्रश्न मात्र पोटतिडकीने मांडतात, असा अनुभव अनेक ठिकाणी येत आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप वळसे-पाटील यांचाही तोच मुद्दा आहे.

आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला भेट दिली तेव्हा उमेदवार आणि मतदार दोघेही निवांत असल्याचे चित्र होते. मतदार संघात कुठेही स्पर्धा दिसली नाही. शिवसेनेला उमेदवार हवा तो मिळाला नाही. माजी खा. आढळराव पाटील किंवा त्यांच्या मुलाने विधानसभा लढवावी असा आग्रह झाला, मात्र ऐन वेळी दोघांनीही निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे शिवसेनेने शोधून एक उमेदवार दिला. राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघात जातीय समीकरणे आहेत.

अमूक जातीची एवढी मते तमूक जातीची तेवढी मते असा प्रकार आंबेगाव मतदारसंघात दिसत नाही. यावरून विचारले असता कोळसे-पाटील म्हणाले, माझी ही सातवी निवडणूक आहे. आजपर्यंत कधीही माझ्या मतदारसंघात जातीवरून मतदान झाले नाही. आम्ही आंबेडकर जयंती, ईद, दिवाळी अशा सण उत्सवात भेटतो; मिसळतो. एकमेकांचे सामाजिक कार्यक्रम करतो पण मतदारसंघात जातीवर कधीच मतदान झालेले नाही. शिवसेनेचे उमेदवार राजाराम बाणखेले हे मूळ शिवसैनिक नाहीत असाही एक आक्षेप या मतदारसंघात आहे. ते राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर कडवी टीका केली होती, तेच आता शिवसेनेचे उमेदवार आहेत. हा मुद्दादेखील आंबेगाव विधानसभा मतदारसंघात चर्चेत आहे.

अनुसया महिला उन्नती केंद्र या माध्यमातून महिला कार्यकर्त्यांची तयार केलेली टीम आज आपल्या कामी येत आहे से सांगून वळसे पाटील म्हणाले, मतदार संघात महिला मेळावा आयोजित करायचे ठरवले तर छोट्या सूचनेवरही पंधरा ते वीस हजार महिला एकत्र जमू शकतात. ती आपली जमेची बाजू आहे. या महिला, अन्य महिलांसाठी शासकीय पातळीवरची छोटी मोठी कामे करून देण्यात पुढाकार घेतात. त्यामुळे यांच्याविषयी मतदारसंघात आदराची भावना आहे ती आज माझ्या प्रचारात मदतीला आली आहे. प्रचाराची रणधुमाळी नाही. कसली गडबड नाही. शांतपणे सकाळी उठायचे, प्रचाराला जायचे, मतदारसंघात भेटीगाठी घ्यायच्या, गावात कुठेतरी दुपारचे जेवण करायचे, पुन्हा भेटीगाठी करत संध्याकाळच्या वेळेला एखादी सभा घ्यायची असा शांत आणि निवांत प्रचार या मतदारसंघात पहायला मिळत आहे.

टॅग्स :onionकांदाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019