शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

Maharashtra Election 2019: ...तर जाळून टाका ते जाहीरनामे; राज ठाकरे शिवसेना, भाजपावर बरसले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 9:58 PM

शिवसेना, भाजपानं दिलेल्या आश्वासनांचा राज ठाकरेंकडून समाचार

मुंबई: जाहीरनाम्यातील शब्द पाळत नसाल, तर ते जाहीरनामे जाळून टाका, अशा शब्दांमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंनीशिवसेना, भाजपाला लक्ष्य केलं. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेनं 10 रुपयांच्या थाळीचं आश्वासन दिलं आहे. भाजपा 5 रुपयात जेवण असं म्हणतेय. ही आश्वासनं देण्यापूर्वी गेल्या निवडणुकीवेळी दिलेल्या टोलमुक्त महाराष्ट्राच्या आश्वासनाचं काय झालं, त्या प्रश्नाचं उत्तर द्या, असं आव्हान राज ठाकरेंनी प्रभादेवीतल्या प्रचारसभेत दिलं. मागील निवडणुकीवेळी टोलमुक्तीचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र अजूनही टोल सुरूच आहेत. रस्त्यांवरील खड्डे तसेच आहेत. यांची महापालिकेत सत्ता असूनही यांना खड्डे बुजवता आलेले नाहीत. रस्त्यांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्यानंच रस्त्यांवर खड्डे पडतात. खड्डे बुजवण्यासाठी 200 कोटींचं बजेट असणारी मुंबई जगातली एकमेव महापालिका असेल, अशा शब्दांमध्ये राज ठाकरे शिवसेनेवर बरसले. निवडणुकीवेळी दिलेला शब्द पाळू शकत नसाल, तर मग त्या शब्दाला, जाहीरनाम्याला अर्थ काय? त्यापेक्षा ते जाहीरनामे जाळून टाका, असंदेखील राज ठाकरे पुढे म्हणाले. 'हीच ती वेळ'... मग 5 वर्षे काय केलं, शिवसेनेच्या जाहिरातीवर भडकले राज?राज ठाकरेंनी आरे प्रकरणातील शिवसेना, भाजपाच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. रात्री पानाफुलांना, झाडांना हात लावू नये, अशी आपली संस्कृती सांगते. मात्र या सरकारनं रात्री झाडांवर कुऱ्हाड चालवली. त्यांचं हे कृत्य पाहून मला रमन राघव चित्रपटाची आठवण झाली. रमन राघव रात्री अनेकांच्या हत्या करायचा. सरकारदेखील तेच करत आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. आज मेट्रोसाठी झाडं चिरडली आहेत. उद्या तुम्हालादेखील चिरडतील, असं म्हणत राज यांनी उपस्थितांना मतदानातून आपला संताप व्यक्त करण्याचं आवाहन केलं.Maharashtra Election 2019: मुंबईतील मेट्रोच मराठी माणसाचा घात करणार - राज ठाकरेआरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्या शिवसेनेलाही राज यांनी लक्ष्य केलं. आरेमध्ये कारशेड होऊ देणार नाही म्हणते होते. तरीही एका रात्रीत 2700 झाडं तोडली. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख म्हणतात सत्तेत आल्यावर पुन्हा जंगल घोषित करू. आरेमधील झाडं तोडून झाल्यावर जंगल घोषित करून काय करणार? तिथे गवत लावणार का?, असे प्रश्न उपस्थित करत राज यांनी शिवसेनेवर तोफ डागली. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाAarey Coloneyआरे