शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: कन्येच्या उमेदवारीसाठी खडसे राजी? मुक्ताईनगरचा तिढा सुटण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 12:37 IST

काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसेंनी मुक्ताईनगरातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे

मुक्ताईनगर: अखेर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. माजी मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसेंऐवजी त्यांची कन्या ऍड. रोहिणी खडसे मुक्ताईनगर येथून भाजपच्या उमेदवार असतील, अशी माहिती मिळते आहे. याला विश्वसनीय सूत्रांनी दुजोरा दिला आहे.या निर्णयाबाबत आज महत्वाचे पदाधिकारी व खासदार रक्षा खडसे, महानंदच्या चेअरमन मंदा खडसे यांच्यासह निकटच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चे अंती रोहिणी खडसेंना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. उद्या दुपारी साडेबाराच्या मुहूर्तावर रोहिणी खडसे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे संकेत मिळत आहे.तिकीट कापल्याचे संकेत, खडसेंच्या उमेदवारीबाबत गिरीश महाजन म्हणाले...भाजपाची दुसरी उमेदवार यादी काल जाहीर झाली. त्या यादीतही एकनाथ खडसेंच्या नावाचा समावेश नव्हता. त्यामुळे खडसेंचा पत्ता कापण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र आता त्यांच्या कन्येला उमेदवार मिळणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. यासंदर्भात खडसे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांपैकी कोणीही काल सायंकाळपर्यंत काहीही माहिती देणं टाळलं होतं. खडसेंनी उमेदवारी दाखल केली मात्र ए बी फार्म नाहीकन्येला उमेदवारी देण्यासोबतच एकनाथ खडसेंना राज्यपाल पदही देण्याची चर्चा आहे. एकनाथ खडसेंना उमेदवारी मिळणार की नाही, याची चर्चा सुरू असताना काल सकाळी खासदार रक्षा खडसे मुंबईत आल्या होत्या. त्यांनी दुपारी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नंतर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. खासदार रक्षा खडसे यांच्या माध्यमातून या प्रकरणात तोडगा काढण्यासाठी एकनाथ खडसेंचे प्रयत्न सुरू होते. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019muktainagar-acमुक्ताईनगरEknath Khadaseएकनाथ खडसेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटील