शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: 'या' कारणामुळे शरद पवारांवर ईडीचा गुन्हा; मुख्यमंत्र्यांनी केला गौप्यस्फोट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 13:20 IST

मात्र मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या आरोपावर शरद पवारांनीही उत्तर दिलं आहे.

मुंबई - शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसह इतर नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले त्यानंतर शरद पवारांनी स्वत: ईडी कार्यालयात जाण्याचं ठरवलं होतं. या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. ईडीचा गुन्हा सरकारने नाही तर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर झाला आहे. मात्र याबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

न्यूज १८ लोकमत या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बँकेत वेगवेगळ्या प्रकारचे ठराव केले जायचे, काही कर्ज शरद पवारांच्या निर्देशानुसार देण्यात आलं, काही ठरावात अशा नोंदीही आढळून आल्या आहेत. तर काही वेळा शरद पवारांनी पत्र पाठविले आहेत त्यामध्ये पवारांनी संबंधित व्यक्तीला कर्ज द्या असं आहे. या सर्व गोष्टींच्या आधारे त्यांचे नाव यामध्ये आलं आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

मात्र मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या आरोपावर शरद पवारांनीही उत्तर दिलं आहे. मी कधीही कोणत्याही संस्थेला पत्र दिलेलं नाही. जर मी पत्र दिलं असेल तर त्याची चौकशी व्हावी असं सांगत शरद पवारांनी हे आरोप फेटाळले. 

ईडीचा गुन्हा दाखल झाल्यावरही शरद पवारांनी याबाबत पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर भाष्य केलं होतं. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्या बँकेत मी संचालक नव्हतो, सभासद नव्हतो असं असताना माझ्यावर गुन्हा दाखल केला. मी चौकशीत सहकार्य करण्यास तयार आहे. आचारसंहिता लागल्यानंतर मी राज्यभर निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असणार आहे. त्यामुळे मी चौकशीपासून पळ काढतोय असं अर्थ निघू नये यासाठी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा आणल्याने राष्ट्रवादी यावर काय भाष्य करणार हे पाहणं गरजेचे आहे. 

काय म्हणाले शरद पवार? राज्यात अडचणीत असणाऱ्या जिल्हा बँकांना मदत करताना नाबार्डने काही मार्गदर्शक तत्व आखून दिलं आहे. या बँकांना सहाय्य करुन त्यांचे पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी नाबार्डवर असते. राज्य सहकारी बँकांनी या मार्गदर्शक तत्वाच्या आधारे काही संस्थांना मदत करण्याचा निर्णय घेतला. मात्र माझा याच्याशी काही संबंध नाही, त्या बँकेत मी संचालक नव्हतो, सभासद नव्हतो असं असताना माझ्यावर गुन्हा दाखल केला. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019