शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: आगामी मुख्यमंत्री एकट्या भाजपाचा नसेल; एकनाथ खडसेंनी केला खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 11:54 IST

विधानसभा निवडणूक २०१९ - प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे असते तर राजकारण वेगळ्या दिशेला असतं

जळगाव - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. २०१४ च्या निवडणुकीत युती तोडली नसती तर भाजपाचा एकट्याचा मुख्यमंत्री दिसला नसता. येणारा मुख्यमंत्री भाजपाचा नसेल तर युतीचा असणार आहे असं भाजपा नेते एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलं आहे. 

एकनाथ खडसे म्हणाले की, मी कधीच संपणार नाही, मला जनतेची साथ आहे, जनतेची प्रेम आहे, गेली ४०-४५ वर्ष मी पक्षासाठी काम केलं माझी इच्छा होती मला निवडणुकीची संधी द्यावी पण पक्षाने जो निर्णय घेतला तो मान्य आहे. पण इतकी वर्ष काम करुन पक्षाने अन्याय का केला? याचं उत्तर मिळत नाही तोवर मी पक्षाला हे विचारत राहणार आहे असंही त्यांनी सांगितले.  

शरद पवारांवर ईडीचा गुन्हा दाखल केला तो सरकारने केला नाही तर उच्च न्यायालयाच्या आदेशावर केला आहे. शरद पवारांनी इतके पक्ष बदलले हा त्यांचा इतिहास आहे. मी वस्तूस्थिती आहे ते बोलतो, मला जे वाटतं ते बोलतं. मला सत्तेची लालसा नाही. भाजपामध्ये जे विरोधक आहेत त्यांच्याबाबत पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष अमित शहा यांना सांगितलं आहे. मी पक्षाविरोधात बोलणार नाही जे काही असेल पक्षप्रमुखांशी बोलेन असं एकनाथ खडसेंनी सांगितले. 

तसेच कोणतंही विकासकाम करायला वेळ लागतो, सहापदरी रोडवर बनायला वेळ लागतोच. रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरु आहेत. विलंब होत असेल पण विकास नक्कीच सुरु झाला आहे. कलम ३७० देशाशी निगडीत कलम आहे. माझं घर सुरक्षित राहावं, जिल्हा सुरक्षित राहावं असे संकुचित विचार करणाऱ्यांना कलम ३७० चं महत्व काय कळणार? माझा देश महत्वाचा आहे. निर्णय घ्यायला ७० वर्ष का लागली? असा सवाल खडसेंनी काँग्रेसला केला आहे. 

दरम्यान, कलम ३७० हा देशाचा अखंडतेचा विषय आहे, आज तुम्हाला तिथे घर घेण्याचीही परवानगी नव्हती, माझ्या देशात मला घर घेण्यासाठी अडथळा असणारे हे कलम ३७० काढून देश अखंड आहे हे सिद्ध आहे असं सांगत केंद्र सरकारचं कौतुक केलं. 

महाजन, मुंडे यांची उणीव कायमप्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे असते तर राजकारण वेगळ्या दिशेला असतं. प्रमोद महाजन असते तर देशातील चित्र वेगळं असतं. गोपीनाथ मुंडे यांची उणीव सातत्याने भासत राहील.  कुंकविना सुवासिनी तशी नाथाभाऊ शिवाय विधानसभा ही कल्पना करवित नाही असं प्रमोद महाजन यांनी सांगितलं होतं. विधानसभेची आठवण कायम येईल अशी भावूक प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली आहे.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Khadaseएकनाथ खडसेGopinath Mundeगोपीनाथ मुंडे