शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
2
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
3
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
4
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
5
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
6
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
7
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
8
कर्ज हवे? चिंता करू नका; तुमचे भविष्य सुरक्षित, तर बॅंका निश्चिंत
9
कंपन्यांच्या पगार खर्चात १०% वाढ होणार, नव्या कायद्यामुळे भार; अनेक जबाबदाऱ्याही पडणार
10
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
11
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
12
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
13
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
14
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
15
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
16
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
17
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
18
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
19
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
20
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : मोदींना परदेशात मिळणाऱ्या मानसन्मानामुळे काँग्रेसला पोटदुखी, जतमध्ये अमित शहांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 13:49 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : पंतप्रधान नरेंद्र मोदींना परदेशात मिळणाऱ्या मानसन्मानामुळे काँग्रेसला पोठदुखी होत असल्याचा टोला, भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आज जत येथील प्रचारसभेल लगावला.

जत (सांगली) - पंतप्रधान नरेंद्र मोदींना परदेशात मिळणाऱ्या मानसन्मानामुळे काँग्रेसला पोठदुखी होत असल्याचा टोला, भाजपाध्यक्षअमित शहा यांनी आज जत येथील प्रचारसभेल लगावला. तसेच राज्यात 15 वर्षे केलेल्या कारभारावरूनही अमित शहा यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. अमित शहा यांनी  गेल्या पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यात केलेल्या विकासकामांचा आढावा घेताना केंद्रात 10 वर्षे आणि राज्यात 15 वर्षे सत्तेत असताना काय केले, याचा हिशेब शरद पवार यांनी द्यावा, असे आव्हान अमित शहा यांनी दिले. ''पूर्वी पंतप्रधानांनी परदेश दौरा केला तरी कुणाला कळतही नसे. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा परदेश दौऱ्यावर जातात. तेव्हा तेथील लोक त्यांचे थाटात स्वागत करतात. मोदी मोदी अशा घोषणा दिल्या जातात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना परदेशात मिळणाऱ्या या मानसन्मानामुळे काँग्रेसला पोठदुखी होत आहे. पण मोदी मोदीच्या दिल्या जाणाऱ्या घोषणा हा काही मोदींचा किंवा भाजपाचा सन्मान नाही. तर तो या देशातील सव्वाशे कोटी नागरिकांचा सन्मान आहे, असे अमित शहा म्हणाले. दरम्यान, आज जत येथे झालेल्या सभेत अमित शहा यांनी पुन्हा एकदा कलम 370 चा उल्लेख केला. 70 वर्षांनंतर कलम 370 हटवण्यात यश आले. कलम 370 हटवल्यामुळे काश्मीरमधील जनता आता शांतता अनुभवत आहे, असे अमित शहा यांनी सांगितले. तसेच केवळ मतांच्या राजकारणासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशा निर्णयांना विरोध होत आहे, अशी टीका त्यांनी केली. यावेळी राज्यात फडणवीस सरकारने केलेल्या विविध विकासकामांचाही अमित शहा यांनी आढावा घेतला. तसेच जतमधील कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या भागामधील गावांमध्ये असलेला पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच येडियुरप्पा यांनीही या दुष्काळग्रस्त गावांना पाणी देण्याचे आश्वासन दिले आहे, असे अमित शहा यांनी सांगितले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Amit Shahअमित शहाjat-acजाटcongressकाँग्रेसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस