Maharashtra Election 2019: घोषणांचा पाऊस ! बेरोजगारांना 5 हजारांचा भत्ता, महाआघाडीचा शपथनामा जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 18:12 IST2019-10-07T17:38:39+5:302019-10-07T18:12:36+5:30
Maharashtra Election 2019: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, नवाब मलिक यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी

Maharashtra Election 2019: घोषणांचा पाऊस ! बेरोजगारांना 5 हजारांचा भत्ता, महाआघाडीचा शपथनामा जाहीर
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संयुक्त पुरोगामी महाआघाडीने (Congress-NCP manifesto) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. महाआघाडीच्या या जाहीरनाम्याला शपथनामा असे नाव देण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी, तरुण सुशिक्षित बेरोजगारांना 5 हजार रुपये मासिक भत्ता यांसारख्या महत्त्वपूर्ण घोषणा या शपथनाम्यात (Congress-NCP manifesto) करण्यात आल्या आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, नवाब मलिक यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महायुतीचा शपथनामा पत्रकार परिषद घेऊन प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यान सर्वसामान्य नागरिक, युवा वर्ग आणि शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवण्यात आल आहे. तसेच, विदर्भ, मराठवाडा आणि दुष्काळग्रस्त भागात उद्योग वाढीसाठी सरकार प्रयत्न करेल, असंही सांगण्यात आलंय. तर, कामगारांचे किमान वेतन 21 हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात असल्याचेही शपथनाम्या म्हटले आहे.
तरूण, सुशिक्षित बेरोजगारांना मासिक पाच हजार रुपये भत्ता देणार! #Shapathnamapic.twitter.com/zNbDh9ME3L
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) October 7, 2019
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी
सुशिक्षित बेरोजगारांना पाच हजार रुपये मासिक भत्ता
शासकीय आणि अनुदानित महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पदवीपर्यंत मोफत शिक्षण
उच्च शिक्षणासाठी शून्य टक्के व्याजदराने शिक्षण कर्ज
राज्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य विमा
कामगारांना किमान 21 हजार वेतन
स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठ
सर्व महापालिका हद्दीतील 500 चौरस फूट घरांना मालमत्ता करमाफी
80% स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्यासाठी विशेष कायदा करणार
ठिबक आणि तुषार सिंचनासाठी 100% अनुदान देणार
दुधाला उत्पादन खर्चावर आधारित भाव
जात पडताळणी प्रक्रियेत सुटसुटीतपणा आणणार
विदर्भ,मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र,कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील मागास तालुक्यात उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी स्वतंत्र धोरण आखणार
निम अंतर्गत कामगारांना पूर्णवेळ कामगारांचा दर्जा देणार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. @Jayant_R_Patil व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. @bb_thorat
— NCP (@NCPspeaks) October 7, 2019
यांनी मित्रपक्षांचे नेते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज संयुक्त पुरोगामी लोकशाही महाआघाडीचा #शपथनामा आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई प्रकाशित केला. pic.twitter.com/OCIYXzWvFQ