शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

CoronaVirus Updates: राज्यात कोरोनाचा कहर; 24 तासांत आढळले 58,924 नवे रुग्ण, 351 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 10:46 PM

आतापर्यंत एकूण 31,59,240 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी गेले आहेत. सध्या राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 6,76,520 वर पोहोचली आहे. तर राज्यात 37,43,968 लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत आणि 27,081 जण इंस्टिट्यूशनल क्वारंटइनमध्ये आहेत. (Maharashtra CoronaVirus updates)

 

मुंबई - राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे 58,924 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर 351 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना मृत्यू दर 1.56 टक्के एवढा झाला आहे. याशिवाय आज नवीन 52,412 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.04 टक्के एवढे आहे. (Maharashtra CoronaVirus updates Today newly 58,924 patients have been tested as positive, 351 dead)

आतापर्यंत एकूण 31,59,240 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी गेले आहेत. सध्या राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 6,76,520 वर पोहोचली आहे. तर राज्यात 37,43,968 लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत आणि 27,081 जण इंस्टिट्यूशनल क्वारंटइनमध्ये आहेत. 

CoronaVirus : Google Maps वर असं सर्च करा कोरोना टेस्ट सेंटर आणि व्हॅक्सीन सेंटर

राज्यात 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांच लसीकरण - देशात 1 मे पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात होणार आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्वांनाच कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्या देशात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. यामध्ये 45 वर्षांवरील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे. देशात लसींचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहितही केले जाणार आहे. तसेच लस उत्पादन करणाऱ्या कंपन्या आपल्या एकूण क्षमतेच्या 50 टक्क्यांपर्यंत पहिल्यांदा घोषित केलेल्या किंमतींवर राज्य सरकारांना आणि खुल्या बाजारातही विक्री करु शकणार आहेत. तर 50 टक्के लसी कंपन्यांना केंद्र सरकारला पुरवाव्या लागतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

CoronaVirus: मोदी सरकारचा मोठा निर्णय; इंग्लंड, अमेरिका, जपानच्या लशींना मंजुरीची आवश्यकता नाही, अमित शाह म्हणाले...

मुंबईत 24 तासांत 57 जणांचा मृत्यू - कोरोना व्हारसर पसरण्याचा वेग दिवसागणिक वाढतच चालला आहे. महाराष्ट्रात तर कोरोना रोजच्या रोजच नवा विक्रम करत आहे. अशीच स्थिती मुंबईचीही आहे. येथेही रोजच्या रोज सक्रीय रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. आज मुंबईत 7381 नवे रुग्ण नोंदवले गेले. तर गेल्या 24 तासांत कोरोनामुळे तब्बल 57 जणांचा मृत्यू झाला. 

'या' 6 राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी नियम कडक -केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंड राज्य कोरोनाचा विचार करता संवेदनशील आहेत, असे महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे. ट्रेनने येणाऱ्या प्रवाशांना 48 तासांच्या आत करण्यात आलेल्या आरटीपीआर तपासणीचा रिपोर्ट बंधनकारक आहे. या संवेदनशील भागांतून येणाऱ्या रेल्वे गाड्यांत महाराष्ट्रासाठी अनारक्षित तिकिटांचे बुकिंग करण्यात येणार नाही. प्रवाशाजवळ आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट नसल्यास त्याची रॅपिड अँटीजन टेस्ट केले जाईल.

देश सोडून चिनी कोरोना लस घेण्यासाठी नेपाळमध्ये का जातायत लोक? उत्तर वाचून व्हाल अवाक!

...तर हातावर मारण्यात येणार 15 दिवसांचा क्वारंटाइन स्टम्प -तपासात पॉझिटिव्ह अथवा कोरोनाची लक्षणे असणाऱ्या लोकांना क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठविण्यात येणार आहे. तसेच ज्यांना लक्षणे नाहीत, अशांच्या हातावर 15 दिवसांच्या क्वारंटाइनचा स्टम्प मारण्यात येईल. याशिवाय, ज्यांनी आपल्यासोबत आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट आणला आहे अथवा स्टेशनवर तपासादरम्यान अँटीजन टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आली आहे, अशांच्याही हातावर 15 दिवसांच्या क्वारंटाइनचा स्टम्प मारण्यात येणार आहे. लक्षण आणि पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना इंस्टिट्यूशनल क्वारंटानिमध्ये पाठविण्यात येईल. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसMaharashtraमहाराष्ट्र