CoronaVirus : Google Maps वर असं सर्च करा कोरोना टेस्ट सेंटर आणि व्हॅक्सीन सेंटर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 10:00 PM2021-04-19T22:00:27+5:302021-04-19T22:06:38+5:30

तपासणीला जाण्यापूर्वीच लोक Google Maps वरून जवळपासच्या कोरोना टेस्ट सेंटरची माहिती घेऊ शकतात. (corona test and vaccine centre information)

देशात कोरोना रुग्ण सख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी पुन्हा एकदा लॉकडाउन सारखे पाऊल उचलले आहे. अनेक लोकांना हेल्थ केअर सर्विसच्या अभावामुळे बेसिक फॅसिलिटीज मिळविणेही अवघड झाले आहे. विशेष म्हणजे, या व्हायरससंदर्भात लोकांच्या मनात अनेक गैरसमजही आहेत. यामुळे, सुरक्षितता म्हणून स्वतःची कोटोना टेस्टदेखील करून घेण्याची त्यांची इच्छा असते. (How to find corona test and vaccine centre information in india via apple map and google map)

टेस्ट सेंटर महीत नसल्याने लोकांना अनेक वेळा भटकावे लागते. अनेकदा तर अनेकांना तपासणी शिवायच घरी परतावे लागते. मात्र, तपासणीला जाण्यापूर्वीच लोक Google Maps वरून जवळपासच्या कोरोना टेस्ट सेंटरची माहिती घेऊ शकतात.

Google Maps मध्ये सेंटरचे फोन नंबरदेखील दिलेले असतात. याच्या सहाय्याने ते तपासणीला जाण्यापूर्वीच सेंटरमध्ये फोन करून तपासणीसंदर्भातील सूचनाही मिळवू शकतात. यात आपल्याला लॅब सेंटर आणि त्यांची वेळही मिळू शकते.

टेस्ट सेंटर सर्च करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम Google Maps आपल्या मोबाइलमध्ये ओपन करावे लागेल. यात आपल्याला covid test near me अथवा COVID 19 test सर्च करावे लागेल. यासाठी आपण दुसरे की-वर्ड्स अर्थात Covid testingचाही वापर करू शकतात.

हे अँड्रॉईड आणि आयओएस दोन्ही डिव्हाईसवर काम करते. दोन्ही स्मार्टफोन्सचे युझर्स ही माहिती थेट आपल्या गुगल मॅप्स अॅपमध्ये पाहू शकतात. विशेष म्हणजे यात आपल्याला कोणते सेंटट खासगी आहे आणि कोणते सरकारी याचीही माहिती मिळेल.

COVID-19 टेस्ट सेंटर शोधण्याचे फिचर Google Mapsमध्ये गेल्या वर्षीच अॅड करण्यात आले होते. आता यात युझर्सना त्यांच्या जवळपासचे सेंट्र शोधण्यासाठीही फिचर अॅड करण्यात आले आहे. Apple Maps देखील आयओएस यूझर्सना COVID-19 टेस्ट सेंटर शोधण्याचे फिचर देते.

याकाळात कधीही Google Maps वर कोरोना टेस्ट सेंटर आणि व्हॅक्सीन सेंटर सर्च करून आणि माहिती घेऊनच घराबाहेर पडणे योग्य...