Maharashtra CM : भारतनाना, बबनदादा, यशवंत माने म्हणाले, आम्ही कोणत्या पवारांसोबत हे आताच कसे सांगू?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 12:42 IST2019-11-23T12:42:02+5:302019-11-23T12:42:43+5:30
राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे म्हणाले की मी आता आमच्या गावात आहे.

Maharashtra CM : भारतनाना, बबनदादा, यशवंत माने म्हणाले, आम्ही कोणत्या पवारांसोबत हे आताच कसे सांगू?
सोलापूर : काय घडलय, कशामुळं घडलंय आम्हाला काहीच माहित नाही. आम्हाला कुणाचा फोनही आला नाही. मग कुणासोबत आहोत हे कसे सांगू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील तीन आमदारांनी दिली.
राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे म्हणाले की मी आता आमच्या गावात आहे. आमच्या साखर कारखान्यावर मोळी टाकण्याचा कार्यक्रम आहे. मला कुणाचा फोन आलेला नाही. काय चाललय मला काहीच माहित नाही. तुम्ही शरद पवार यांच्यासोबत आहात की अजित पवार यांच्यासोबत असे विचारले असता, काय चाललय मलाच माहित नाही. मग कसे सांगणार?
भारत भालके म्हणाले, मी कुणासोबत आहे हे आताच कसे सांगू. भारत भालके सध्या पंढरपुरात आहे एवढच सांगू शकतो. आमदार यशवंत माने म्हणाले अजितदादांनी या निर्णयाची कल्पना आम्हाला दिली नव्हती. पण पक्षाने सायंकाळी साडेचार वाजता मुंबईत बोलावली आहे. त्यानंतर आम्ही कुणासाहेब आहोत हे सांगता येईल.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे समोर येत आहे. तसेच पवार यांच्या शपथविधीनंतर मुंडे यांचा फोनही स्वीच ऑफ येत आहे. यामुळे धनंजय मुंडे, सुनिल तटकरे आदी नेते शरद पवार यांच्यासोबत असल्याचे कळत आहे.
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारही अज्ञातस्थळी रवाना झाले असून राष्ट्रवादी, शिवसेनेची पत्रकार परिषद काही वेळातच होणार आहे.