लाल टिळा, भगवा कुर्ता, शपथविधीवेळी नितेश राणेंनी वेधून घेतलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 20:09 IST2024-12-15T20:09:21+5:302024-12-15T20:09:54+5:30
Maharashtra Cabinet expansion: आज झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपाकडून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये कोकणातून कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.

लाल टिळा, भगवा कुर्ता, शपथविधीवेळी नितेश राणेंनी वेधून घेतलं लक्ष
आज झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपाकडून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये कोकणातून कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. नितेश राणे यांनी आज संध्याकाळी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. दरम्यान, शपथविधीवेळीच्या नितेश राणे यांच्या वेशभूषेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
मागच्या काही काळापासून प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेमुळे नितेश राणे यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही नितेश राणे यांनी आक्रमक हिंदुत्त्ववादी प्रचार केला होता. दरम्यान, मंत्रिमंडळात समावेश झाल्यावर आजच्या शपथविधीवेळीही नितेश राणे यांनी आज हिंदुत्वाला साजेशी वेशभूषा करून कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. नितेश राणे हे लाल टिळा आणि भगवा कुर्ता घालून शपथ घेतली.
नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. २०१४ मध्ये ते काँग्रेसकडून निवडणूक लढवताना पहिल्यांदा विजय मिळवला होता. त्यानंतर २०१९ आणि २०२४ मध्ये ते भाजपाकडून विजयी झाले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या संदेश पारकर यांचा तब्बल ५८ हजार मतांनी पराभव केला होता.