शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
3
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
4
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
5
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
6
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
7
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
10
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
11
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
12
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
13
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
14
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
15
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
16
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
17
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
18
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
19
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
20
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
Daily Top 2Weekly Top 5

Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 19:16 IST

Kshitij Hitendra Thakur on Vinod Tawde: विनोद तावडे सकाळी १० वाजल्यापासून हॉटेलमध्ये होते. पोलीस खात्यालाही तावडे आलेत हे माहिती नाही. ते देशाचे नेते, एवढा मोठा नेता विरारसारख्या छोट्या गावात येतो, पोलिसांना अंदाज नाही. - क्षितीज ठाकूर.

विनोद तावडेंची माहिती देणारे आरएसएसचे होते. त्यांनाही हे पटत नाही. राजन नाईक दोन तासांपासून महिलांच्या घोळक्यात मान खाली टाकून बसले होते. या महिला कोण होत्या? या महिला तोंड लपवून बसल्या होत्या. त्यांना विचारले तर त्यांनी नाव सांगितले नाही. नाईकांना पत्रकारांनी बोलवूनही ते दोन तास आले नाहीत, असे म्हणत क्षितीज ठाकूर यांनी महिला लपलेला व्हिडीओ दाखविला. 

या महिलांना नाव विचारले नाव सांगितले नाही, पत्ता विचारला तर तोही सांगितला नाही. जिन्यावर लपलेले, रेस्टॉरंटमध्ये लपलेले. कोपरे कोपरे पकडून लपलेले. राजन नाईक स्वत: दिसू नये म्हणून लाईट बंद करून महिलांमध्ये लपलेले. दोन तास ते समोर आले नाहीत. मर्द होते तर यायचे होते समोर. हे जे १९ लाख सापडले ते भाजपाच्या निवडणूक खर्चात टाकणार होते का, असा गौप्यस्फोट ठाकूर यांनी केला.

या लोकांनी अख्खे हॉटेल बुक केलेले. ५००-७०० लोक होती. दोन्ही हॉल बुक केले होते. रेस्टॉरंट बुक होती. आम्ही तर हे पैसे आणले नव्हते. आम्ही आलो आणि पाठोपाठ पोलीस आले. उद्या हे म्हणतील या लोकांनी प्लांट केले. निवडणूक आयोग कारवाई करेल अशी अपेक्षा नाही, जनता करेल. आमचे कार्यकर्ते महिलांना काही करणार नाहीत म्हणून हे त्यांच्यात लपले होते. आम्ही पोलीस आणि निवडणूक आयोगाला माहिती दिलेली. पत्रकारांना आम्ही बोलावले नव्हते. त्यांच्याकडून तुम्हाला कोणी माहिती दिली माहिती नाही. पत्रकार आले तर गैर काय, असा सवाल ठाकूर यांनी केला. 

एवढी चांगली कामे केली असती तर पैशांची गरज काय पडते? एका बाजुला रामाचे नाव घेणार आणि दुसऱ्या बाजुला पैसे देणार. महिलांना १५०० रुपये देतात आणि इकडे करोडो रुपये वाटतात. महिलांना द्या ना ५० हजार रुपये, तुमचे कॅशमधले व्यवहार कमी करा, असा खोचक टोला क्षितीज ठाकूर यांनी केला. जर आम्ही काम केले नाही तर पैसे वाटायची काय गरज पडली. खासदार येतात आणि सांगतात की ३५ वर्षांत काही झाले नाही. या खासदारांच्याच वडिलांचा मतदारसंघ होता. आपल्याच वडिलांनी काही केले नाही असे सांगत आहेत, असा आरोप ठाकूर यांनी केला. 

विनोद तावडे सकाळी १० वाजल्यापासून हॉटेलमध्ये होते. पोलीस खात्यालाही तावडे आलेत हे माहिती नाही. ते देशाचे नेते, एवढा मोठा नेता विरारसारख्या छोट्या गावात येतो, पोलिसांना अंदाज नाही. जर नसेल तर तावडे लपून का आले, जर माहिती होते तर पोलीस का आले नाहीत, असा सवाल क्षितीज ठाकूर यांनी केला. 

या महिला कोण होत्या? 

या महिला कार्यकर्त्या नव्हत्या, तर त्या पैैसे डिस्ट्रीब्यूट करणाऱ्या होत्या. पोलिसांना आम्ही या महिलांना एका बाजुला करून तपासा असे सांगितले, परंतू पोलिसांनी या महिलांना न तपासताच बाहेर काढले, असा गंभीर आरोप ठाकूर यांनी केला आहे. एका रुममध्ये ९ लाख, एका रुममध्ये १० लाख रुपये मिळाले. पोलिसांनी या लोकांना रुम तपासायचे आहेत म्हणून सांगून लोकांना न तपासताच बाहेर काढले. ते किती असतील कोणाला माहिती. आमच्यासमोर १९ लाख रुपये मिळाले होते, असा दावा ठाकूर यांनी केला.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेKshitij thakurक्षितिज ठाकूरHitendra Thakurहितेंद्र ठाकूरBJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४