शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

भर सभेतच असदुद्दीन ओवैसींना पोलिसांनी दिली नोटीस; त्यानंतर काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 11:12 IST

Maharashtra Assembly Election 2024 : असदुद्दीन ओवैसी यांची सभा सुरू असतानाच, स्टेजवरच पोलिसांनी त्यांना नोटीस दिली. त्यामुळे सभेस्थळी एकच चर्चा सुरु झाली.

सोलापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्ष व्यस्त आहेत. दरम्यान, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही सोलापूरात प्रचार सभा घेतली. यावेळी असदुद्दीन ओवैसी यांची सभा सुरू असतानाच, स्टेजवरच पोलिसांनी त्यांना नोटीस दिली. त्यामुळे सभेस्थळी एकच चर्चा सुरु झाली.

बुधवारी (दि.१३) सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार फारुख शाब्दी यांच्या प्रचारसभेला खासदार असदुद्दीन ओवैसी आले होते. त्यावेळी इतरांचे भाषण सुरू असतानाच सोलापूर पोलिसांनी त्यांना स्टेजवरच नोटीस दिली. असदुद्दीन ओवैसी  यांनी आपल्या भाषणात कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाही, अशी प्रक्षोभक भाषा वापरू करू नये अशी नोटीस पोलिसांनी दिली. भारतीय नागरिक संहिता कलम १६८ प्रमाणे पोलिसांनी ही नोटीस दिल्याची माहिती आहे. 

पोलिसांच्या नोटिशीतील चुका वाचून दाखवल्या जेलरोड पोलिसांनी ओवैसींना प्रक्षोभक भाषण करू नये, अशी नोटीस दिली. ही नोटीस मराठीत होती. मला मराठी कळत नाही. इंग्रजी भाषेत नोटीस द्या. वाचून सही करतो, असे असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले. यातून पोलिसांची पळापळ झाली. यानंतर असदुद्दीन ओवैसी यांनी इंग्रजीतून आलेली नोटीस जाहीरपणे वाचताना त्यातील चुकाही वाचून दाखवल्या.

महागाईच्या विषयाबद्दल बोला - असदुद्दीन ओवैसीमहायुती सरकारने एका हाताने लाडक्या बहिणींना १५०० रुपये दिले. दुसरीकडे महिलांवर महागाई लादून १९०० रुपये काढून घेतले, अशी टीका असदुद्दीन ओवैसी यांनी केली. तसेच, असदुद्दीन ओवैसी यांनी लाडकी बहीण योजना लागू होण्यापूर्वी आणि पैसे दिल्यानंतर झालेली किराणा मालाची दरवाढ वाचून दाखवली. महागाईने या राज्याला बरबाद केले,  असे सांगत ते म्हणाले, तुम्ही निवडणुकांकडे हिंदू मुस्लिमांची लढाई म्हणून बघू नका. महागाईच्या विषयाबद्दल बोला. भाजप नेत्यांनी सोलापुरातून लष्कराचे युनिफॉर्म तयार करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाचे काय झाले. 

जरांगे-पाटलांनी तुमची झोप उडवली - असदुद्दीन ओवैसीमराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द भाजपने दिला होता. आता तो शब्द न पाळल्यामुळे मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलन सुरू केले. जरांगे-पाटलांनी तुमची झोप उडवली आहे. तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागेल, असे असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

मग बी टीम कोण याचा विचार करा : शाब्दी फारुख शाब्दी म्हणाले, महायुती सरकारच्या काळात लोकांची घरे तोडण्याचे काम सुरू आहे. संविधान, लोकशाहीला संकटात आणण्याचे काम सुरू आहे. एमआयएम भाजपची बी टीम असल्याची टीका काँग्रेसवाले करतात. आम्ही बी टीम असतो तर लोकसभेला सोलापुरात उमेदवार देऊन काँग्रेसला पराभूत केले असते. पण भाजपला रोखण्यासाठी आम्ही उमेदवार दिला नाही. काँग्रेसचे पाच नगरसेवक भाजपमध्ये गेले. मग बी टीम कोण आहे याचा विचार करा.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीsolapur-city-central-acसोलापूर शहर मध्य