शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

राज ठाकरेंची मोरारजी देसाईंसोबत तुलना, उद्धव ठाकरेंवर बोलताना..; संजय राऊतांची जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 12:14 IST

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात शा‍ब्दिक युद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. विक्रोळीतील राज ठाकरेंच्या टीकेनंतर संजय राऊत आक्रमक झालेत. 

मुंबई - राज ठाकरे काय म्हणतात, त्याला महाराष्ट्रात किंमत नाही. मोरारजी देसाई यांच्यानंतर राज ठाकरेंना गुजरात आणि महाराष्ट्राचं एकाचवेळी नेतृत्व करण्याची इच्छा आहे. परंतु महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाला फार काही स्थान नाही अशी जहरी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर केली आहे. 

आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मोरारजी देसाई यांच्यानंतर राज ठाकरेच आहेत. महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेच्या स्वाभिमानाबद्दल राज ठाकरेंच्या मनात काय आहे याबाबत आमच्या मनात शंका कायम राहील. उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि अस्मितेचा प्रचार करतायेत. उद्धव ठाकरे यांची लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे. शरद पवारांची लढाई ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे असं त्यांनी सांगितले.

त्याशिवाय हे दोन्ही पक्ष आणि दोन्ही नेते ज्या संघर्षाने महाराष्ट्रात उतरले आहेत. तो स्वत:च्या स्वार्थासाठी संघर्ष नसून ज्यापद्धतीने गुजरातच्या २ व्यापाऱ्यांनी मुंबई आणि महाराष्ट्राची जी लूट चालवली. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे २ पक्ष फोडले आणि हे महाशय त्यांच्या बाजूने उभे आहेत. आम्हाला मोरारजी देसाई यांची आठवण झाली. हे दुर्दैव आहे. ते खूप महान नेते आहेत मला त्यांच्यावर बोलायचं नाही. पण उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना आपण थोडे भान ठेवा. ते शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेतच पण महाराष्ट्रावर डल्ला मारणाऱ्या गुजरातच्या २ व्यापाऱ्यांविरोधात त्यांची लढाई सुरू आहे अशा भाषेत संजय राऊतांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला. 

कोण होते मोरारजी देसाई?

काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असं विधान करणारे मोरारजी देसाई यांची भूमिका महाराष्ट्राच्या निर्मितीत आडमुठीपणाची राहिली. १९७७ साली देशात पहिल्यांदा बिगर काँग्रेस सरकार स्थापन झालं तेव्हा ते पंतप्रधान बनले होते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. काँग्रेस पक्ष आणि त्यावेळचे नेते यांच्याविरोधामुळे संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला. या लढ्याला बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा देत व्यंगचित्राच्या माध्यमातून काँग्रेसवर टीका सुरू ठेवली होती. त्यावेळी काँग्रेस सरकारने बाळासाहेब ठाकरेंच्या नावे अटक वॉरंट जारी केले होते. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेSharad Pawarशरद पवारBJPभाजपा