शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 13:07 IST

षडयंत्र करून त्यांनी उद्धव ठाकरेंना भाजपापासून दूर केले हे आता स्वत: शरद पवार कबुल करत आहेत असा टोला फडणवीसांनी लगावला. 

मुंबई - भाजपाला पाठिंबा देण्याचा काही प्रश्नच नव्हता. आम्हाला शिवसेनेला भाजपापासून वेगळं करायचं होतं म्हणून राजकीय चाचपणी केली असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला आहे. २०१४ साली भाजपाला पाठिंबा देण्यावरून एका मुलाखतीत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी पवारांनी या प्रश्नावर खुलासा केला.

२०१४ साली भाजपाने न मागता तुमच्या पक्षाकडून पाठिंबा देण्यात आला होता, त्यामागे काय हेतू होता असा प्रश्न पत्रकाराने मुलाखतीत विचारला. त्यावेळी शरद पवार म्हणाले की, विनाकारण नाही, तर २०१४ साली भाजपाला आम्हाला पाठिंबा द्यायचा नव्हताच. आम्हाला केवळ शिवसेना आणि भाजपा यांची जी युती होती त्यांना वेगळे कसं करता येईल. करू शकतो का हे आम्हाला पाहायचे होते. त्यासाठी चाचपणी म्हणून आम्ही राजकीय विधान केले आम्ही त्यांना मदत कधी केली नाही. केवळ विधान केले होते मात्र त्या विधानानंतर जसं आम्हाला हवं होते तेच झाले. भाजपा गेले आणि शिवसेना आमच्यासोबत आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले असं विधान पवारांनी केले. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी यावर भाष्य केले.

तर शरद पवार वारंवार रोज नवीन गोष्टी सांगत आहेत. षडयंत्र करून त्यांनी उद्धव ठाकरेंना भाजपापासून दूर केले हे आता स्वत: शरद पवार कबुल करत आहेत. २०१९ ला भाजपा-राष्ट्रवादीची बैठक झाली ते त्यांनी अमान्य केले होते. मी २०२० पासून या बैठकीबाबत सांगत आहे. मी स्पष्ट सांगितले, गौतम अदानी बैठकीत नव्हते, ही बैठक दिल्लीत झाली होती असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

२०१४ साली काय घडलं होतं?

२०१४ साली भाजपा-शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सगळे प्रमुख पक्ष वेगवेगळे निवडणूक लढले होते. त्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष बनला. त्यानंतर निकालाच्या दिवशीच शरद पवारांच्या सांगण्यावरून राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल यांनी माध्यमांना येऊन आम्ही भाजपाला सरकार बनवण्यासाठी बाहेरून पाठिंबा देऊ असं विधान केले. त्यानंतर विधानसभेत भाजपाने बहुमत सिद्ध केले. तेव्हा शिवसेना विरोधी बाकांवर बसली होती. विरोधी पक्षनेते म्हणून एकनाथ शिंदे काम करत होते. मात्र काही महिन्यातच विरोधी बाकांवरील शिवसेना भाजपासोबत सत्तेत आली. त्यानंतर २०१९ पर्यंत शिवसेना-भाजपाने सरकार चालवले. परंतु २०१९ च्या निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रि‍पदावरून शिवसेना भाजपात बिनसले आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी बनली आणि राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस