शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
2
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
5
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
6
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
7
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
8
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
9
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
10
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
11
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
12
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
13
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
14
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
15
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
16
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
17
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
18
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
19
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
20
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

घनसावंगी विधानसभा मतदारसंघात राजेश टोपेंविरुद्ध हिकमत उढाण पुन्हा आखाड्यात !

By विजय मुंडे  | Updated: November 8, 2024 09:02 IST

Maharashtra Assembly Election 2024: पाच वेळा आमदार, माजी आरोग्यमंत्री म्हणून काम केलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेश टोपे यांच्याविरुद्ध शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा एकदा हिकमत उढाण यांना मैदानात उतरविले आहे.

- विजय मुंडेजालना - जालना जिल्ह्यातील पाच पैकी घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील लढत यंदा चांगलीच चुरशीची होत आहे. पाच वेळा आमदार, माजी आरोग्यमंत्री म्हणून काम केलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेश टोपे यांच्याविरुद्ध शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा एकदा हिकमत उढाण यांना मैदानात उतरविले आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री आ. राजेश टोपे यांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून सलग पाचवेळा विजय मिळविला असून, यंदा ते षटकार मारण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत. शिवसेना शिंदे गटाने जागा वाटपात अखेरपर्यंत जोर लावत ही जागा आपल्याकडे खेचली असून, टोपे यांचे राजकीय विरोधक हिकमत उढाण यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात टोपे विरूद्ध उढाण अशी लढत आहे. परंतु भाजपला सोडचिठ्ठी दिलेले सतीश घाटगे आणि उद्धव सेनेचे माजी आमदार शिवाजी चोथे यांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोरांमुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे- मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र असलेले अंतरवाली सराटी हे गाव घनसावंगी मतदारसंघात येते. त्यामुळे मराठा व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा कळीचा आहे.- या मतदारसंघात पूर्वीपासूनच उसाचे गाळप आणि उसाचा दर हे मुद्दे राजकीय पटलावरील प्रमुख विषय राहिले आहेत. दोन्ही प्रमुख उमेदवारांसह घाटगे यांचाही कारखाना असून, ऊसही येथे कळीचा मुद्दा राहणार आहे.- मतदारसंघातील रस्त्यांसह इतर मूलभूत सोयी-सुविधांचा प्रश्न कायम असून, विरोधकांकडून या मुद्द्यांना हात घालत प्रचार यंत्रणा राबविली जात आहे.माजी मंत्री आ. राजेश टोपे गत २५ वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांची, आरोग्यमंत्री म्हणून केलेल्या कामांची माहिती घेऊन मतदारसंघातील मतदारांसमोर जात आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ghansawangi-acघनसावंगीRajesh Topeराजेश टोपे