शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

असा एक तरी सर्व्हे दाखवा ज्यात...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली जमिनीवरची परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 20:00 IST

विधानसभा निकालानंतर स्पष्ट बहुमत मिळेल. लोक आम्हाला निवडून देतील अशी परिस्थिती आहे. जमिनीवरची परिस्थिती बदलली आहे हे दिसून येते, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. 

मुंबई - भाजपाचा सर्व्हे मला माहिती नाही; पण जगाला, देशाला, पत्रकारांना माहिती पडतो. हा सर्व्हे कोणता..? मला असा एक तरी सर्व्हे दाखवा त्यात काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला इतक्या जागा मिळतील असं दाखवलं आहे. भाजपाच्या सर्व्हेत पक्षाला संतोषजनक वातावरण आहे. प्रत्येक सर्व्हेत आम्हाला आमच्या जागा वाढलेल्या दिसताहेत. कुठेही नकरात्मक सर्व्हे नाही. अतिशय पॉझिटिव्ह सर्व्हे असून विजयाकडे घेऊन जाणारा हा सर्व्हे आहे, असं विधान भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी आणि सहयोगी संपादक यदु जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभेवेळी अपेक्षाकृत आमच्या लोकांची नाराजी जास्त होती. आम्ही अजितदादांना सोबत घेतले तेव्हा इतकी नाराजी असेल वाटलं नव्हतं. परंतु आज तशी परिस्थिती नाही. बेरजेचे राजकारण काय आहे हे आम्ही आमच्या मतदारांना, संघटनांना समजावू शकलो आहोत. त्यामुळे ८० टक्के मनाने, २० टक्के शिस्तीने मतदार आमच्यासोबत आहेत. अजितदादा सगळ्या आमदारांना घेऊन सिद्धीविनायकला जातात. जेव्हा आम्ही हिंदुत्व मांडतो तेव्हा ते कधी प्रतिवाद करत नाहीत. अजितदादा आमच्याकडे आल्याने त्यांच्यात परिवर्तन होतंय हे दिसून येतं. ही निवडणूक चुरशीची असेल. विधानसभा निकालानंतर स्पष्ट बहुमत मिळेल. लोक आम्हाला निवडून देतील अशी परिस्थिती आहे. जमिनीवरची परिस्थिती बदलली आहे हे दिसून येते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

प्रत्येकाला आपापला पक्ष आहे, त्यामुळे जास्त जागा मिळाव्यात असा आग्रह असतो. कार्यकर्त्यांचाही असतो. महाविकास आघाडीशी तुलना करता आम्ही सामंजस्याने जागावाटप केले. पहिल्या २ चर्चांमध्ये आमचं २४० जागांचं वाटप झालं होतं. ४८ जागांपैकी ३८ जागांवर तिसऱ्या चर्चेत तोडगा निघाला. १० जागांवर निश्चितपणे आम्हाला त्रास झाला. शेवटी त्याचा निकालही आम्ही लावला आहे. महायुतीत आम्हाला १६०-१६५ जागांची अपेक्षा होती. परंतु १५२ जागा मिळाल्या. महायुतीत तीन पक्ष लढत असताना १५२ जागा मिळणे हेदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे, असं फडणवीसांनी नमूद केलं. 

५० वर्षं राम मंदिराचं स्वप्न उराशी बाळगून आम्ही एक दिवस हे स्वप्न पूर्ण करू शकतो अशा ताकदीने काम करायचे. जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा राम मंदिर उभं राहिले. त्यामुळे शत प्रतिशत भाजपा एका दिवसात होऊ शकत नाही. लोकांचा विश्वास आम्हाला अधिक कमवावा लागेल. आज महाराष्ट्रात जे काही युतीचे राजकारण आहे त्याला पर्याय नाही. भाजपाची ताकद आहे, पण केवळ ताकदीवर निवडून येऊ शकतो का तर असं नाही. आम्हाला मित्रांची गरज आहे. त्यामुळे आम्ही मित्रांसोबत लढतोय असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले. 

भाजपा तत्त्व पाळण्याचा प्रयत्न करतं, परंतु...

राजकारणात अनेकांना वाटतं, ही निवडणूक आपण लढलो नाही तर ही जीवनातील अंतिम निवडणूक आहे असं वाटते. अलीकडच्या काळात राजकीय कार्यकर्ते थांबण्यासाठी तयार नाहीत. त्यामुळे पक्षातून लोक जातात. सगळ्याच पक्षातून जात असतात पण सरसकट असं होत नाही. आज आमच्या पक्षात अनेकांनी अर्ज भरले, ते माघारी घेताहेत. भाजपात जे तत्त्व आम्ही सांगतो, ते पाळतोही. सत्तेचं राजकारण असल्याने जितकं जास्त असेल तितकं तत्त्व पाळण्याचा प्रयत्न करतो असं फडणवीसांनी म्हटलं. 

शरद पवारांमधील परिवर्तन स्वागतार्ह 

राजकारणाची जी दिशा मोदींनी बदलली, राजकीय नेते ईश्वराचे भक्त होते, धार्मिक होते पण ते लपून लपून करायचे. मंदिरात गेल्यावर पुरोगामी प्रतिमा खराब होतेय असं त्यांना वाटायचे. मोदींमुळे ते नेते मंदिरात उघड जाऊ लागले. वारीत जाणार, मंदिरात जाणार हे शरद पवारांचे परिवर्तन स्वागतार्ह आहे, असा टोला फडणवीसांनी लगावला.

पाहा व्हिडिओ

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMahayutiमहायुती