शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 11:40 IST

Maharashtra Assembly Election 2024 Ashish Shelar And Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

ठाणे हे गद्दारीचं केंद्रबिंदू आहे. या केंद्रबिंदूच्या बुडाला आग लावली तर संपूर्ण महाराष्ट्र गद्दारमुक्त होईल असं उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत म्हटलं आहे. सभा संपून राष्ट्रगीत झाल्यानंतर स्टेजवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी झाली. त्याचवेळी स्टेजचा काही भाग अचानक खाली गेला. सुदैवाने उद्धव ठाकरे यांच्यासह इतर कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेने खळबळ उडाली. यावरुन भाजपाने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 

"स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. "नुसते सावत्र नाही हे भाऊ तर आहेत भलतेच लबाड, अडीच वर्षात लुटले खूप मोठे घबाड. उबाठा सेनेच्या सभेचा स्टेज ठाण्यात खचला, यांच्या प्रत्येक पराभवाचा इतिहास ठाण्यानेच रचला" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "स्टेज खचला! संकेत कळला? जनता जेव्हा होती कोरोनात तडफडत, हे सगळे बसले होते नातेवाईकांना कंत्राटे वाटत. रिक्षा, टँक्सी, फेरिवाल्यांना दिला एक रुपया. ना आठवण झाली कधी लाडक्या बहिणींची, घरे भरली स्वतःची, दारुवाले आणि बिल्डरांची. नुसते सावत्र नाही हे भाऊ तर आहेत भलतेच लबाड, अडीच वर्षात लुटले खूप मोठे घबाड. त्यांचे एक टोक होते १०० कोटीची ती वसूली, या कफन चोरांना लाज नाही कसली."

"काल उबाठा सेनेच्या सभेचा स्टेज ठाण्यात खचला, यांच्या प्रत्येक पराभवाचा इतिहास ठाण्यानेच तर रचला! यांच्या भाषणांचा प्रभाव पाहा किती? भाषण संपताच खचते पायाखालची माती!!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तर दुसरीकडे सभेतून उद्धव ठाकरे यांनी "ठाण्याला गद्दारीचा कलंक लागला आहे. हा कलंक आता पुसण्याची वेळ आली आहे.  ठाणे महापालिकेला यांनी भिकेला लावलं आहे. हे आणि यांचे बगलबच्चे आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी पालिकेची तिजोरी रिकामी केली आहे" असं म्हणत टीका केली होती. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ashish Shelarआशीष शेलारBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाthaneठाणे