शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याचं अमित शाहांच कारस्थान, संजय राऊत यांचा सनसनाटी आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 12:40 IST

Maharashtra Assembly Election 2024;

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं कारस्थान भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रचलं असल्याचा सनसनाटी आरोप ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच यासाठी अमित शाह यांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरल्याचा दावाही त्यांनी केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हा २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे, तर २६ नोव्हेंबर रोजी जुन्या विधानसभेची मुदत संपत आहे, त्याचा आधार घेत संजय राऊत यांनी हा दावा केला आहे.

संजय राऊत आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामधील नवं सरकार सत्तेवर येऊ नये, यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाला हातीशी धरून पुढची तयारी केली आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आहे. २३ नोव्हेंबर रोजी निकाल आहे आणि २६ तारखेपर्यंत सरकार स्थापन करायचं आहे. एवढा कमी वेळ खरंतर दिला जात नाही.आतापर्यंतचा इतिहास तुम्ही पाहिला असेल.

संजय राऊत पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी निवडणूक लढतेय आणि जिंकणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी असेल, तर संपूर्ण निकाल लागेपर्यंत २४ तारीख उजाडेल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जिंकलेले आमदार इथे येतील. त्यांना इथे पोहोचायला एक दिवस लागेल. २६ तारखेला बैठका घेणं विधिमंडळ पक्षाचे नेते निवडणं. राज्यपालांकडे दावा करणं, यासाठी किमान वेळ लागतो, तो दिलेला नाही. २६ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन होऊ शकलं नाही, पुढे सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लावायची, असं फार मोठं कारस्थान अमित शाह यांनी रचलं आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.

कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात स्वाभिमानी लोकांचं सरकार बनू द्यायचं नाही. हे राज्य महाराष्ट्राच्या शत्रूंच्याच हातात राहावं. सूरत, अहमदाबाद आणि गुवाहाटीला ज्यांनी कांड केली. त्यांच्या हातात राज्य राहावं, यासाठी राष्ट्रपती राजवट लगेच  लावायची म्हणून फक्त दोन दिवसांचा कालावधी सरकार स्थापन करण्यासाठी दिलेला आहे. लोकशाहीच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचा घाणेरडा व्यवहार कधी झालेला नाही, असा व्यवहार अमित शाह करताहेत. ते महाराष्ट्राचे क्रमांक एकचे शत्रू आहेत. बाकी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे महाराष्ट्राच्या दुश्मनांचे हस्तक आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी यावेळी केली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sanjay Rautसंजय राऊतAmit Shahअमित शाहMahavikas Aghadiमहाविकास आघाडीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग