शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"रवी राणा हे विनाशकाले विपरीत बुद्धी, त्यांच्याबद्दल…", अजित पवारांनी फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 12:50 IST

Maharashtra Assembly Election 2024 : रवी राणा यांनी सुलभा खोडके यांच्याबद्दल एक विधान केले आहे. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रवी राणा यांच्यावर निशाणा साधला आहे.

अमरावती :  सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अमरावती मतदारसंघातून सुलभा खोडके यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिली आहे. मात्र, बडनेरा विधानसभेचे आमदार आणि महायुतीतील घटक पक्ष असलेल्या युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रवी राणा यांनी सुलभा खोडके यांच्याबद्दल एक विधान केले आहे. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रवी राणा यांच्यावर निशाणा साधला आहे.

एका सभेत बोलताना रवी राणा यांनी अमरावतीची एक जागा निवडून आली नाही तर काही होत नाही, असे विधान सुलभा खोडके यांच्याबद्दल केले होते. रवी राणा यांनी केलेले हे विधान सध्या चर्चेत आले आहे. यावरून अजित पवारांनी रवी राणा यांना फटकारले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना समज द्यावी, असा सल्लाही दिला आहे. आज (दि.१२) अजित पवार अमरावतीमध्ये आले असता त्यांना याबाबत प्रश्न विचारला. तेव्हा, त्यांनी आपली प्रतिक्रिया देत यावर भाष्य केले.

अजित पवार म्हणाले, "रवी राणा विनाशकाले विपरीत बुद्धी असल्या सारखे आहेत. त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. किंबहुना स्वतःच्या बोलण्यातून ते त्यांच्या पत्नीच्या पराभवाला कारणीभूत ठरले आहेत. शेवटी लोक बोलत असतात, आपण प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं नसतं. लोकांना फार नकारात्मक बोलेलं आवडत नाही. जनता सकारात्मक विचार करत असते."

याचबरोबर, "आम्ही रवी राणा यांना दोनवेळा विधानसभेला पाठिंबा दिला आहे. मात्र, आमचा उमेदवार चांगला मताधिक्यानं विजयी करण्याचा प्रयत्न करत आहे. तो विजयी होणार आहे. तसेच, आनंदराव अडसूळ हे सुद्धा मला भेटले होते. त्यांनीही रवी राणा हे आपल्या विरोधात काम करतात,’ असे त्यांनी सांगितले. हे बरोबर नाही. देवेंद्र फडणवीसांनी रवी राणांना समजावून सांगितलं पाहिजे. महायुतीत अंतर पडणार नाही, अशी काळजी घेतली पाहिजे," असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ravi Ranaरवी राणाAjit Pawarअजित पवारamravati-acअमरावतीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस