भाजपला दणका: प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 17:26 IST2019-10-02T17:17:54+5:302019-10-02T17:26:43+5:30

गोर्डे हे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे खंदे समर्थक समजले जात होते.

Maharashtra Assembly Election 2019 bjp Vice president datta gorde patil Joins ncp | भाजपला दणका: प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादीत दाखल

भाजपला दणका: प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादीत दाखल

मुंबई - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर सुद्धा राजकीय पक्षात आयाराम-गयाराम सुरूच आहे. त्यातच आता भाजपला मोठा धक्का बसला असून भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित गोर्डे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

पैठण येथील माजी नगराध्यक्ष व भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी काही वेळापूर्वी भाजपला राम-राम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पैठण मतदारसंघ शिवसेनेला सुटल्याने नाराज असलेल्या गोर्डे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे गोर्डे हे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे खंदे समर्थक समजले जात होते.



 

गेल्या काही दिवसांपासून गोर्डे यांनी पैठणमध्ये भाजपला मोठ करण्यात मोठा वाटा उचलला होता. लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी  महत्वाची  भूमिका बजावली होती. मात्र त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर तालुक्यातील अनेक पदाधिकारी सुद्धा आता त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019 bjp Vice president datta gorde patil Joins ncp