शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

"कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात, सरकार फक्त लाडक्या कंत्राटदारांचे हित जपण्यात व्यस्त’’, काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 18:25 IST

Maharashtra Assembly Budget Session 2026: महायुती सरकारने अर्थसंकल्प मध्ये  जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही निव्वळ धूळफेक असून, सरकारने ३० सप्टेंबर २०२५ ची अट घालून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला.

मुंबई -  महायुती सरकारने अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही निव्वळ धूळफेक असून, सरकारने ३० सप्टेंबर २०२५ ची अट घालून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला. अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान बोलताना त्यांनी शेती, सिंचन आणि राज्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवरून सरकारवर कडक ताशेरे ओढले.

शेतकरी प्रश्नांवर बोलताना वडेट्टीवार यांनी कर्जमाफीच्या निकषांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वडेट्टीवार म्हणाले ज्या शेतकऱ्यांचे कर्ज २ लाखांच्या वर आहे, त्यांना लाभ कसा मिळणार? आधी त्यांनी वरची रक्कम भरावी आणि मग तुम्ही २ लाख देणार का? सरकारने ७/१२ कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? शेतकरी कर्जमाफीचे नेमके निकष काय आहेत,याची स्पष्टता आली पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले.

विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याची मागणी होती, मात्र अर्थसंकल्पात त्याचा कोणताही उल्लेख नाही. सरकारने हा बोनस जाहीर करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केला. तसेच धान खरेदीचा कोटा संपल्याने शेतकरी अडचणीत आलेला आहे. असून मदत मिळालेली नाही. त्यामुळे हा कोटा वाढवून देण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली.

एकीकडे सरकार डबल इंजिन सरकार म्हणते पण अतिवृष्टीनंतर केंद्राकडून महाराष्ट्राला मदत मिळालेली नाही.केंद्राच्या पथकाने दोन वेळा पाहणी केली.राहू सरकारने नोव्हेंबर महिन्यात प्रस्ताव पाठवला होता पण अजूनही हा निधी मिळालेला केंद्राचे पथक दोनदा महाराष्ट्रात येऊन गेले. केंद्र सरकार गुजरातला तात्काळ मदत पाठवते पण महाराष्ट्राला सापत्न वागणूक का? असा सवाल वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला.

अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या जमिनींची, ढासलेल्या विहिरी यांची अद्याप दुरुस्ती झालेली नाही. राज्यात दररोज तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरीही सरकार ५०० कोटी खर्च करून बीकेसीमध्ये 'एआय कृषी महोत्सवा'चे इव्हेंट करण्यात मग्न आहे, यातून काय साध्य झाले? तापी खोऱ्यातील उपसा सिंचन योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. कागदोपत्री चुकीची लाभक्षेत्रे दाखवून निधी लाटला जात आहे. विदर्भाचा लाभ दुसरीकडेच दाखवून कोण लोणी खात आहे? हे लाडके कंत्राटदार नेमके कोणाचे आहेत? असा टोला त्यांनी लगावला.

राज्यातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून पोलीस भरतीतही अनियमितता होत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.बीडमध्ये पोलीस भरती प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून, अपात्र तरुणांना तोंडी परीक्षेत जास्त गुण दिल्याचे आरोप झालेले आहेत. ही प्रक्रिया पारदर्शक झाली नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले. अहिल्यानगर जिल्ह्यात ७०० कोटींची वसुली करणाऱ्या आणि सीबीआयच्या रडारवर असलेल्या वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्यांना मोक्याच्या ठिकाणी पोस्टिंग का दिली जात आहे? अशा अधिकाऱ्यांना क्लिनचीट देऊन पाठीशी घालू नका,अस वडेट्टीवार म्हणाले. चंद्रपूर जिल्ह्यात ९१ लाखांच्या बनावट नोटा सापडणे ही राज्याच्या सुरक्षेसाठी धोक्याची घंटा आहे.या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress slams loan waiver as betrayal, favors contractors only.

Web Summary : Congress criticizes Maharashtra's loan waiver as a sham, favoring contractors. Vadettiwar questions eligibility criteria, demands clarity, and highlights unmet promises to farmers. He also accuses the government of neglecting Vidarbha's farmers and showing favoritism towards Gujarat in disaster relief.
टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरीVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार