‘मॅग्मो’च्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी भेट निष्फळ

By Admin | Updated: June 3, 2014 01:40 IST2014-06-03T01:40:33+5:302014-06-03T01:40:33+5:30

महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने (मॅग्मो) केलेल्या 11 मागण्यांविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी संध्याकाळी संघटनेच्या शिष्टमंडळाला बोलावले होते.

Magmoh's delegation meets with Chief Ministers failless | ‘मॅग्मो’च्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी भेट निष्फळ

‘मॅग्मो’च्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी भेट निष्फळ

>मुंबई : महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने (मॅग्मो) केलेल्या 11 मागण्यांविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी संध्याकाळी संघटनेच्या शिष्टमंडळाला बोलावले होते. अडीच तास चर्चा होऊनही समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे मॅग्मो आपला संप सुरू ठेवणार असल्याची माहिती मॅग्मो अध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड यांनी दिली.
मॅग्मोच्या बेमुदत संपामध्ये राज्यातील 12 हजार वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ आरोग्य अधिकारी सहभागी झाले आहेत. गेल्या तीन वर्षापासून सतत पाठपुरावा करूनही मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे मॅग्मो या संघटनेने 2 जूनपासून संप करण्याचे ठरविले होते. ठरल्याप्रमाणो सोमवारी राज्यभरातील वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ आरोग्य अधिकारी आझाद मैदानामध्ये जमा झाले. चार वर्षापूर्वीच मागण्या मान्य झाल्या आहेत. त्या कृतीत उतरायला हव्यात, अशी मॅग्मोची मागणी आहे. 
1 जून 2क्क्6 पासून राज्यातील सर्वच वैद्यकीय अधिका:यांना 6 वा वेतन आयोग लागू व्हावा, वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिका:यांना केंद्र शासन आणि वैद्यकीय शिक्षण विभागाप्रमाणो उच्च वेतन मिळावे, सन 2क्क्9-1क् मध्ये सेवा समावेशन झालेल्या वैद्यकीय अधिका:यांना पूर्वलक्षी लाभ द्यावा, अस्थायी स्वरूपात काम करणा:या सुमारे 789 बीएएमएस व 32 बीडीएस वैद्यकीय अधिकारी गट ब यांना कायम सेवेत घेण्यात यावे, तीन वर्षापूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाचगणी येथे मॅग्मो संघटनेच्या मॅगकॉन परिषदेत केलेल्या घोषणोनुसार आरोग्य विभागाचा पुनर्रचना आयोग स्थापन करण्याची कार्यवाही लवकर पूर्ण करावी, अशा 11 मागण्या मॅग्मोने केल्या आहेत. 4 वर्षापासून मागण्या मान्य न झाल्यामुळे संपाचे पाऊल उचलले असल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले. मॅग्मोच्या संपाचा मुंबईतील वैद्यकीय व्यवस्थेवर परिणाम झाला नाही. सरकारी रुग्णालयात नियमितपणो कामकाज सुरू असल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली. 
 
आमच्या संपामध्ये मार्डदेखील सहभागी होणार असल्याचे मॅग्मो सांगत आहे. मात्र प्रत्यक्षात मार्डच्या म्हणण्यानुसार, मॅॅग्मोच्या संपाला आम्ही पाठिंबा दिला आहे. आम्ही त्यांच्याबरोबर संपात सहभागी होणार नसल्याचे मार्डचे अध्यक्ष डॉ. संतोष वाकचौरे यांनी सांगितले. 

Web Title: Magmoh's delegation meets with Chief Ministers failless