शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

मॅगी करत होती फसवणूक

By admin | Updated: June 7, 2015 01:47 IST

देशभरात मॅगीवर बंदी घातल्यावर अखेर १६ दिवसांनी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने मॅगीच्या नमुन्यांचा संपूर्ण अहवाल सादर केला.

मुंबई : देशभरात मॅगीवर बंदी घातल्यावर अखेर १६ दिवसांनी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने मॅगीच्या नमुन्यांचा संपूर्ण अहवाल सादर केला. राज्यातून घेतलेल्या २० नमुन्यांपैकी ५ नमुन्यांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त शिसे आढळले आहे. पाकिटावर ‘अजिनोमोटो नाही’ असे छापले असतानाही सर्व नमुन्यांत अजिनोमोटो आढळून आले. त्याचप्रमाणे अन्नसुरक्षा प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र नसतानाही मॅगी ओट्स मसाला न्यूडल्स विकत होते. अशा प्रकारे मॅगी ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे एफडीए अहवालात स्पष्ट झाले आहे. याच मुद्द्यांवर इतर राज्यातही मॅगीवर बंदी घातली आहे. बाराबंकी येथील मॅगीच्या पाकिटात शिश्याचे जास्त प्रमाण आढळल्यानंतर मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा अशा ठिकाणांहून २० नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यापैकी १५ नमुन्यांमध्ये शिश्याचे प्रमाण योग्य असल्याचे आढळून आले. तर, पाच नमुन्यांमध्ये (२.५५, २.५९, २.६०, २.६२, ४.६६ पीपीएम) शिश्याचे प्रमाण जास्त आढळून आले आहे. हिमाचल प्रदेश, गोवा व उत्तराखंडमध्ये तयार झालेल्या मॅगीत शिश्याचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले आहे. मॅगीच्या प्रत्येक पाकिटावर मोनोसोडियम ग्लुटामेट (एमएसजी) नाही, असा टॅग लावण्यात येतो. पण, प्रत्यक्षात मॅगीच्या प्रत्येक नमुन्यांमध्ये एमएसजी आढळून आले आहे. मॅगीला अन्नसुरक्षा प्राधिकरणाने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. परंतु, मॅगी ओट्स मसाला न्यूडल्सला ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. तरीही बाजारात खुलेआमपणे विक्री होते. न्यूडल्सच्या ९ वेगवेगळ्या प्रकारांचा साठा परत पाठवण्याचे आदेश दिले. आयुक्तांनी घातली बंदी... : अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी ‘राज्यात मॅगीला बंदी’ अशी घोषणा ५ जूनला केली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी ६ जूनला नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर एफडीए आयुक्तांनी अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६चे कलम ३०(२)नुसार प्राप्त अधिकारानुसार राज्यात मॅगीच्या बंदीचे आदेश दिले आहेत.