शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

युतीतील तणावामुळे मनसेचे वेट अॅण्ड वॉच!

By admin | Updated: September 16, 2014 02:44 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी औरंगाबादेत इच्छुकांच्या मुलाखती घेत असतानाच अचानक काढता पाय घेतला.

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी औरंगाबादेत इच्छुकांच्या मुलाखती घेत असतानाच अचानक काढता पाय घेतला. तसेच सायंकाळी प्रसिद्धिमाध्यमांनाही सामोरे जाण्याचे टाळले. दोन्हींमागे त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण दिले. मात्र, यामागील खरे कारण हे शिवसेना-भाजपा युतीतील वाढता तणाव असल्याचे बोलले जात आहे. युतीत बेबनाव झाला तर मनसेने भाजपाचा नवीन मित्रपक्ष बनण्याची तयारी चालवल्याचे सूत्रंनी सांगितले. 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी मराठवाडा आणि खान्देशातील इच्छुकांच्या मुलाखती आयोजित केल्या होत्या. सकाळी 11 वाजता मुलाखतींना सुरुवात झाली. काही मुलाखती झाल्यानंतर प्रकृतीचे कारण सांगून राज तेथून बाहेर पडले. त्यानंतर उर्वरित मुलाखती घेण्याची जबाबदारी गटनेते बाळा नांदगावकर, आ. प्रवीण दरेकर, आ. मंगेश सांगळे आदींवर सोपवून त्यांनी हॉटेल गाठले. दरम्यान, राज हे भाजपा नेत्यांच्या संपर्कात असल्याने त्यांना मुलाखतींच्या काळातही सतत दिल्ली-मुंबईहून भाजपा नेत्यांचे फोन येत होते. याच कारणामुळे त्यांनी सायंकाळी प्रसिद्धिमाध्यमांनाही टाळले. नियोजित कार्यक्रमानुसार राज ठाकरे सायंकाळी प्रसिद्धिमाध्यमांशी संवाद साधणार होते. त्यानुसार प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी हॉटेलमध्ये गर्दी केली होती. मात्र, राज दोन तास उशिराने प्रसिद्धिमाध्यमांना सामोरे गेले; पण त्यांनी प्रकृती बरी नसल्याचे सांगत आज बोलणार नसल्याचे सांगितले. त्याचे कारणही युतीतील तणाव असल्याचे बोलले जाते. जर शिवसेना-भाजपा युती झाली नाही, तर भाजपाचा सहकारी म्हणून मनसेची महाराष्ट्रात भाजपा-रिपाइं-स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांच्याशी युती होण्याची शक्यता आहे.  युतीत बेबनाव झाल्यास राज ठाकरे भाजपाचे नवीन सहकारी राहतील व त्यामुळे त्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेण्याचे टाळले. युतीचे काय होते ते बघून राज ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता आहे. भाजपासोबत जायचे झाल्यास मनसेसाठी 5क् जागाही पुरेशा ठरतील, असे मनसेच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले. (प्रतिनिधी)