शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

हत्या झालेला जगत निघाला प्रियकर

By admin | Updated: March 22, 2017 02:18 IST

बदलापूरमध्ये राजेश नेपाळी या तरुणाने केलेल्या हत्येमागील गूढ उकलले आहे. पोलिसांना विविध कारणे सांगून गुंतविण्याचा आरोपीचा प्रयत्न फसला

बदलापूर : बदलापूरमध्ये राजेश नेपाळी या तरुणाने केलेल्या हत्येमागील गूढ उकलले आहे. पोलिसांना विविध कारणे सांगून गुंतविण्याचा आरोपीचा प्रयत्न फसला असून, या हत्येमागे अनैतिक संबंध असल्याचे समोर आले आहेत. राजेश नेपाळीच्या पत्नीसोबत हत्या झालेल्या जगत शाहीचे अनैतिक संबंध होते, असे तपासात पुढे आले आहे. राजेश आणि जगत यांची ओळख नव्हती. मात्र पहिल्या भेटीतच जगत हा आपल्या पत्नीचा प्रियकर असून, त्यांचे अनैतिक संबंध असल्याचे कळताच रागाच्या भरात राजेशने त्याची हत्या केली. १५ मार्चला बदलापूरमधील कात्रप परिसरात धड आणि मुंडके वेगळे केलेला मृतदेह सापडला. या प्रकारानंतर राजेशला पोलिसांनी शिताफीने भुसावळ येथे अटक केली. अटकेनंतर राजेश पोलिसांना तपासात योग्य सहकार्य करत नव्हता. पोलिसांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे ही हत्या समलैंगिक संबंधातून घडली असावी या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला असता राजेशने हे कारण नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर राजेशने खरे कारण सांगितले. त्याला गावाला जायचे असल्याने ढाब्याच्या मालकांनी पर्यायी कूकची सोय करण्यास राजेशला सांगितले होते. त्यानुसार एका वेटरच्या ओळखीतून राजेश आणि जगत यांची ओळख करून देण्यात आली. पहिल्याच भेटीत ते दोघे दुकानातच दारू पिण्यासाठी बसले होते. दारू प्यायल्यावर जगतने नेपाळमधील आपल्या अनैतिक संबंधाची माहिती राजेशला देण्यास सुरुवात केली. मात्र, ज्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते ती राजेशचीच पत्नी असल्याचे समजताच आपले बाळही जगतचे असल्याचा संशय आला. हत्येनंतर दुकानातून राजेश गायब झाला. पोलिसांनी नेपाळच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेतून ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)