शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

वीज ग्राहकांची सर्रास लूट

By admin | Updated: December 28, 2014 00:44 IST

विजेसंदर्भातील आकडेवारी पाहिली असता महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना लुटले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वीज खरेदीचे दर अधिक असल्याने वीज महाग असल्याचा तर्क दिला जातो.

शेजारी राज्यांच्या आकडेवारीवरून खुलासा : विनाकारण आर्थिक बोजा कमल शर्मा - नागपूर विजेसंदर्भातील आकडेवारी पाहिली असता महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना लुटले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वीज खरेदीचे दर अधिक असल्याने वीज महाग असल्याचा तर्क दिला जातो. हा तर्क न्यायोचित असल्याचेही वाटते. परंतु लोकमतने शेजारच्या राज्यातील वीजदरांची तुलना केली असता महाराष्ट्रातील वीज ग्राहकांवर विनाकारण आर्थिक बोजा टाकला जात असल्याचे दिसून येते. मध्य प्रदेश वीज वितरण कंपनी आणि महाराष्ट्रातील वितरण कंपनीच्या आकडेवारीची तुलना केली असता, मध्य प्रदेशातील कंपनी ३.०९ रुपये प्रति युनिट सरासरी प्रमाणे शासकीय आणि खासगी कंपनींकडून वीज खरेदी करून सामान्य नागरिकांसह उद्योगांपर्यंत ती वीज पोहोचवते. यासाठी कंपनीतर्फे ४.६० रुपये प्रति युनिट प्रमाणे दर आकारले जाते. परंतु महाराष्ट्रातील महावितरण कंपनी ही ३.५७ रुपये प्रति युनिटपमाणे वीज खरेदी करते आणि नागरिकांना ती वीज पोहोचेपर्यंत ६.६१ रुपये होऊन जाते. त्यामुळे स्वाभाविकपणे मध्य प्रदेशातील कंपनी ३.०९ रुपये दराने वीज खरेदी करून ती ४.६० रुपयात नागरिकांना उपलब्ध करून देऊ शकते तर ३.५७ रुपये दराने वीज खरेदी करणाऱ्या महावितरणची वीज नागरिकांपर्यंत पोहचत ६.६१ रुपये कशी होते याचेही एक गौडबंगाल आहे. महावितरण प्रति युनिट २.३२ रुपये इतर बाबीवर खर्च करते तर मध्य प्रदेशातील कंपनीचा तोच खर्च केवळ ९६ पैसे आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यातही महावितरण मध्य प्रदेशपेक्षा पुढे आहे. उदाहरणार्थ पूर्व मध्य प्रदेशातील कंपनी यासाठी जिथे प्रति युनिट ५५ पैसे खर्च करते तिथे महावितरण कंपनी ७२ पैसे खर्च करते. कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत कुठलाही आक्षेप नाही. कर्मचाऱ्यांना चांगला पगार मिळालाच पाहिजे. परंतु आक्षेप इतर खर्चांवर आहे. इतर खर्चांमध्ये अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध सोयी सुविधांचा समावेश आहे. उदाहरणार्थ विमान सेवा, आॅफिस, साधनसुविधा आदींवर होणारा खर्च कितीतरी अधिक आहे. अधिकाऱ्यांच्या सुविधांवर जिथे एक राज्य केवळ ९६ पैसे खर्च करीत आहे तिथे महाराष्ट्रातील कंपनी २.३२ रुपये खर्च का करते, हा संशोधनाचा विषय आहे. याचिका दाखलयासंदर्भात विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे आर.बी. गोयनका यांनी प्रदेश वीज नियामक आयोगासमोर याचिका दाखल करून याचा विरोध केला आहे. महावितरणने आपल्या खर्चांमध्ये कपात करून ग्राहकांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. सामान्य नागरिक अगोदरच महागड्या विजेने त्रस्त आहेत. अशात महावितरणने पुन्हा या खर्चांच्या आधारावर आयोगासमोर याचिका दाखल करून वीज दरवाढ करण्यास परवानगी मागितली आहे.