लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 17:56 IST2025-08-11T17:53:38+5:302025-08-11T17:56:24+5:30

Maratha Sardar Raghuji Bhosale Sowrd : सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी लंडनला जाऊन मिळवला ताबा, १८ ऑगस्टला मुंबईत होणार दाखल

London The historic sword of the brave Maratha Sardar Raghuji Bhosale is in the possession of the Maharashtra government. | लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

Maratha Sardar Raghuji Bhosale Sowrd : नागपूरकरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार रघुजी भोसले यांची महाराष्ट्र सरकारने लिलावात जिंकलेली तलवार आज लंडन येथे जाऊन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ताब्यात घेतली. सोमवारी, १८ ऑगस्टला ही तलवार मुंबईत दाखल होणार आहे. ऐतिहासिक दस्तऐवज असलेली सदर तलवार लिलावात निघाल्याचे वृत्त २८ एप्रिल २०२५ रोजी अचानक येऊन महाराष्ट्रात धडकली. आशिष शेलार यांना ही बातमी कळताच त्यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन तलवार शासनाला मिळावी, या दृष्टीने नियोजन केले. दूतावासात संपर्क करुन स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी नियोजन व संपर्क यंत्रणा उभी केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे आशिष शेलार यांनी तातडीने मध्यस्थ उभा करुन या लिलावात शासनाचा सहभाग नोंदवला आणि तो लिलाव जिंकला.

महाराष्ट्र शासनातर्फे ज्या मध्यस्थाने हा लिलाव जिंकला, त्यांना लंडन येथे प्रत्यक्ष भेटून कायदेशीर बाबी पूर्ण करुन आज आशिष शेलार यांनी ही तलवार ताब्यात घेतली. "अशाप्रकारे परदेशात गेलेली ऐतिहासिक वस्तू लिलावात जिंकून मिळवण्याची ही पहिलीच वेळ ठरली. अनेक पराक्रमांची साक्षीदार असलेली ही ऐतिहासिक तलवार ताब्यात घेण्याचे भाग्य मला लाभले, हा तमाम महाराष्ट्राचा हा एक ऐतहासिक विजय आहे", असे आशिष शेलार म्हणाले. तलवार त्याब्यात घेताना, लंडनमधील मराठी नागरिकही मोठया संख्येने उपस्थित होते. त्यांनी जल्लोष साजरा केला.

सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करुन ही तलवार सोमवारी १८ ऑगस्टला सकाळी १० वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावर दाखल होईल. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत बाईक रॅली काढून वाजतगाजत ही तलवार दादरच्या पु. ल. देशपांडे कला अकदमीमध्ये आणण्यात येणार आहे.

Web Title: London The historic sword of the brave Maratha Sardar Raghuji Bhosale is in the possession of the Maharashtra government.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.