'लोकमत'च्या चित्रकला स्पर्धेची 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' मध्ये नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 09:24 AM2023-07-11T09:24:02+5:302023-07-11T09:24:28+5:30

महाराष्ट्रासह गोवा राज्यात आयोजन, ३५ जिल्हे, एक हजार शाळा, ४ लाख ७५ हजार विद्यार्थी तासभर रंगले रंगरेषेच्या दुनियेत

'Lokmat' painting competition recorded in 'Asia Book of Records' | 'लोकमत'च्या चित्रकला स्पर्धेची 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' मध्ये नोंद

'लोकमत'च्या चित्रकला स्पर्धेची 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' मध्ये नोंद

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर - 'लोकमत टाइम्स कॅम्पस क्लबच्या 'आर्ट बीट" राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत महाराष्ट्रासह गोवा राज्यातील तब्बल ३५ जिल्ह्यांतील ४ लाख ७४ हजार शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत विक्रम केला. या विक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉईस मध्ये झाली आहे. विक्रमाच्या नोंदीचे प्रमाणपत्र एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स च्या रेखा सिंग यांनी 'लोकमत'चे कार्यकारी करण दर्डा यांना छत्रपती संभाजीनगरातील 'लोकमत भवनमध्ये सुपूर्द केले. यावेळी आयआयबीचे संचालक प्रा. दशरथ पाटील, इव्हेन्ट्स स्टेट हेड रमेश डेडवाल उपस्थित होते.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी 'लोकमत' समूहाचे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट प्रा. लिमिटेड प्रस्तुत 'लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब'च्या 'आर्ट बीट राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे महाराष्ट्र, गोवा राज्यांतील विविध शाळांमध्ये सोमवारी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक शाळेतून गटांतील तीन विजेत्या पाचही प्रत्येकी प्रमाणपत्र दिले.

आनंदाचा क्षण : करण दर्डा

लोकमतचे कार्यकारी संचालक तथा संपादकीय संचालक करण दडा म्हणाले, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, लोकमत समूहाचे संस्थापक-संपादक जवाहरलाल ट उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लोकमत राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित केली. त्याची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद झाली. ही आनंदाची बाब आहे. आयआयबीचे प्रा. दशरथ पाटील यांच्या सहकार्यामुळे हे यश मिळाले.

पाटील यांच्या सहकार्यामुळे हे यश मिळाले. आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट व लोकमत कॅम्पस क्लबच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रासह गोवा राज्यात हा स्तुत्य उपक्रम राबविला. त्यामध्ये लाखो विद्यार्थी सहभागी झाले. हा उपक्रम नक्कीच मुलांच्या कल्पक बुद्धीला चालना देणारा आहे. या उपक्रमाचा भाग झाल्याचा अभिमान आहे. - प्रा. दशरथ पाटील, संचालक, आयआयबी

एक अनोखा उपक्रम : रेखा सिंग महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा एकाच वेळी घेतली. ही अविश्वसनीय गोष्ठ आहे, हे लोकमतच करू शकते. असे गौरवोद्गार एशिया बुक ऑफ रेकॉर्डसच्या रेखा

 

Web Title: 'Lokmat' painting competition recorded in 'Asia Book of Records'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Lokmatलोकमत