शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

घरातील वादाचे निवडणुकीत पडसाद; रामदास तडस यांच्या सुनेचा मारहाणीचा आरोप, खासदार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 1:39 PM

Pooja Tadas And Ramdas Tadas : पूजा तडस यांनी रामदास तडस यांच्या कुटुंबीयांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी रामदास तडस यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात त्यांच्या सूनबाई पूजा तडस या अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. याच दरम्यान आता पूजा तडस यांनी रामदास तडस यांच्या कुटुंबीयांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत पूजा तडस देखील उपस्थित होत्या. 

"मला एका प्लॅटमध्ये टाकलं गेलं, तिथे मला ज्या प्रकराची वागणूक मिळाली ती अपमानास्पद होती. ज्या प्लॅटमध्ये मी राहते, तिथे फक्त एक उपभोगाची वस्तू म्हणून माझा वापर केला गेला. मला बाळ झालं त्यावेळी तडस परिवाराकडून हे बाळ कोणाचं? असं विचारण्यात आलं. या बाळाची डीएनए टेस्ट कर, असं सांगण्यात आलं. प्रत्येक वेळी मला अपमानास्पद वागणूक मिळाली. प्रत्येक वेळी माझ्यावर घणाघाती आरोप लावण्यात आले."

"जेव्हा मी त्यांच्या घरी गेले तेव्हा मला लोखंडी रॉडने देखील मारण्यात आलं. याचे पुरावे मी सर्वांना देणार आहे. एका स्त्रीवर तुम्ही एवढे अत्याचार करता. मी ज्या प्लॅमध्ये राहते तो प्लॅट विकून मला बेघर करण्यात आलं. इतक्या खालच्या पातळीचं राजकारण घडतं. माझ्यासारख्या मुलीने मग जायचं कुठे?" असा सवाल पूजा तडस यांनी विचारला आहे. 

रामदास तडस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुका आल्यावर गंभीर आरोप होतात असं म्हटलं आहे. "निवडणुका आल्यावर गंभीर आरोप होतात. त्यांची कोर्टात केस सुरू आहे. मुलगा आणि मुलगी यांनी लग्न केलं हे देखील मला माहीत नाही. माझा यामध्ये काही संबंध नाही. ती आमच्यासोबत राहत नाही. तिने तिच्या नवऱ्यासोबत राहावं. कोर्टात केस सुरू आहे त्यामुळे मला याचं काही देणं-घेणं नाही. त्यांनी त्यांचं पुढे पाहावं" असं रामदास तडस यांनी म्हटलं आहे.

पूजा तडस यांचे पती पंकज तडस यांनी देखील यावर आता प्रतिक्रिया दिली आहे. "माझा विवाह रद्द करण्यासाठी मी न्यायालयात दाद मागितली आहे. कोर्टात देखील हे मुद्दे मांडण्यात आलेले आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मी यामध्ये जास्त बोलू इच्छित नाही. विरोधी नेत्यांना हाताशी घेऊन यांना फक्त माध्यमात प्रसिद्धी मिळवणं आणि तडस कुटुंबीयांना बदनाम करणं हाच यांचा डाव आहे. माझ्या परिवाराला हनीट्रॅपमध्ये फसवण्याचा हा प्रयत्न आहे" असं पंकज तडस यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Politicsराजकारण