शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

लोकलला ३३९३ कोटींचा तोटा

By admin | Updated: July 30, 2016 01:48 IST

मुंबईची जीवनरेखा असलेली लोकल ट्रेन वाहतूक गेल्या तीन वर्षांपासून ३ हजार ३९४ कोटी रुपये तोट्यात आहे याचे मुख्य कारण लोकल ट्रेन वाहतुकीसाठी रेल्वेला सोसावा लागणारा

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली

मुंबईची जीवनरेखा असलेली लोकल ट्रेन वाहतूक गेल्या तीन वर्षांपासून ३ हजार ३९४ कोटी रुपये तोट्यात आहे याचे मुख्य कारण लोकल ट्रेन वाहतुकीसाठी रेल्वेला सोसावा लागणारा खर्च आणि मुंबईकरांना दिली जाणारी स्वस्त दरातली मासिक पास सुविधा यामुळे वर्षभर पूर्ण क्षमतेने ही वाहतूक सुरू असली तरी मिळणारे प्रत्यक्ष उत्पन्न आणि खर्च यात मोठी तफावत आहे असे उत्तर रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी राज्यसभेत दिले.शिवसेना नेते संजय राऊ त यांच्या मूळ प्रश्नाला उत्तर देतांना प्रभू म्हणाले, मुंबईकर लोकल प्रवाशांची भाडेआकारणी अत्याधिक सबसिडीची आहे. मुंबईकरांना मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक व वार्षिक रेल्वे पासची सुविधा उपलब्ध आहे जी अतिशय स्वस्त आहे. रेल्वेच्या द्वितीय श्रेणी प्रवासाला आकारण्यात येणाऱ्या तिकिटापेक्षाही ती कमी आहे. रेल्वेला या सेवेतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने ही सेवा गेल्या ३ वर्षांपासून तोट्यात आहे.- मुंबई उपनगरी लोकल वाहतुकीची प्रवासी भाडेवाढ न करता ही वाहतूक अधिक लाभदायक करण्यासाठी सरकारने विविध प्रकारची पाउले उचलली आहेत, असे स्पष्ट करतांना प्रभू म्हणाले, इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट (इएमयु)ला बोगीच्या बाहेरच्या भागावर पूर्ण जाहिराती मिळवण्याचे अधिकार. - प्रवासी बोगीत एलईडी डिस्प्ले तसेच वाणिज्यिक जाहिरातींच्या उद्घोषणाव्दारे उत्पन्न मिळवणे, पेपरलेस मोबाईल तिकिटाचे अ‍ॅप सुरू करणे, तिकिटांसाठी स्वयंचलित वेडिंग मशिन्स, अनारक्षित तिकिटांसाठी प्रवासी सुविधा केंद्र तसेच सर्वसाधारण तिकीट बुकिंग सेवा, स्मार्ट कार्ड तिकिट विक्री सुरू करणे, विनातिकिट प्रवाशांकडून सातत्याने दंडाची वसुली करण्यासाठी बॅरियर चेकिंग, रेल्वेचा रनिंग स्टाफ, वाणिज्यिक स्टाफ व तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या ओव्हरटाईम कामाची सातत्याने समीक्षा, अशा काही ठळक योजना रेल्वेने राबवल्या आहेत.- मुंबईच्या उपनगरी रेल्वे वाहतुकीत आमुलाग्र बदल घडवण्यासाठी पर्यायी इलेव्हेटेड मार्ग उभारण्याच्या योजनेला लवकरच गती देण्यात येणार असून सर्वसाधारण व विशेष अशा दोन प्रवर्गात याची विभागणी करण्यात येणार आहे.- या लोहमार्गावरून होणाऱ्या नव्या लोकल ट्रेनच्या प्रवासी वाहतुकीचे दर थोडे अधिक असतील मात्र लोकल ट्रेन वाहतुकीवर सध्या पडणारा भार त्यामुळे काही प्रमाणात कमी होउ शकेल. विशेषत: पावसाळयात मुंबईकरांची गैरसोय होणार नाही.- याखेरीज मुंबईत एमयुटीपी ३ योजना पूर्णत: वेगाने कार्यान्वित करण्याचा सरकारचा इरादा आहे, असे उत्तर प्रभूंनी अजय संचेती यांच्या उपप्रश्नाला दिले.