नागपूर - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी समारोपाच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठ्या घोषणांचा वर्षाव केला. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. शिवसेनेने दिलेल्या आश्वसानाप्रमाणे राज्यात १० रुपयात थाळी देण्याची घोषणाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. त्याबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विदर्भ आणि संपूर्ण राज्यासाठी काही मोठ्या घोषणा केल्या. त्या पुढीलप्रमाणे आहेत. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मोठ्या घोषणा - शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्यात येईल, ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतच सर्व थकीत कर्ज माफ करू- प्रत्येक जिल्ह्यामध्ये CMO कार्यालय सुरु करणार. ते कार्यालय थेट मंत्रालयातील CMO कार्यालयाला जोडलेलं असेल- गोरगरीबांना १० रुपयामध्ये शिवभोजन योजना सुरु करणार. प्रायोगिक तत्वावर ५० ठिकाणी सुरु करणार-सिंचनाच्या कोणत्याही प्रकल्पाला स्थगिती दिलेली नाही, स्थगिती देणार नाही- गोसी खुर्द प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण करणार- यवतमाळ जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी २५३ कोटी रुपये देणार- विदर्भात १२३ सिंचन प्रकल्पांचे काम सुरु आहे- समुद्धी महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करणार, कर्जामुळे व्याजापोटी पैसे द्यावे लागत होते. ते पैसे आता सरकार देईल- आदिवासी मुला-मुलींना चांगल्या दर्जाचे पौष्टिक अन्न देण्यासाठी मध्यवर्ती स्वंयपाकगृह स्थापन करणार- धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अधिकचे २०० रुपये देणार- पूर्व विदर्भात स्टील प्रकल्प उभारण्याची घोषणा
शेतकऱ्यांना कर्जमाफी, १० रुपयांत थाळी यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या या मोठ्या घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 18:18 IST